'तिथे' आम्ही चुकलो...; पहिल्या टी-20 मध्ये झालेल्या पराभवानंतर काय म्हणाला Ibrahim Zadran?

Ibrahim Zadran: टीम इंडियाने सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या पराभवानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झदारन (Ibrahim Zadran) यांने सामन्यात नेमकी कुठे चूक झाली हे सांगितलं आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jan 12, 2024, 11:01 AM IST
'तिथे' आम्ही चुकलो...; पहिल्या टी-20 मध्ये झालेल्या पराभवानंतर काय म्हणाला Ibrahim Zadran? title=

Ibrahim Zadran: टीम इंडिया विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची टी-20 सिरीज सुरु आहे. या सिरीजच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट्सने अफगाणिस्तानवर विजय मिळवला आहे. या विजयामुळे टीम इंडियाने सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या पराभवानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झदारन (Ibrahim Zadran) यांने सामन्यात नेमकी कुठे चूक झाली हे सांगितलं आहे. 

काय म्हणाला इब्राहिम झदारन?

पोस्ट प्रेझेंटेशन सामन्यात इब्राहिम झदारन (Ibrahim Zadran) म्हणाला की, आम्ही 13-15 रन्ससाठी कमी पडलो. याशिवाय आम्ही टॉस देखील गमावला. मात्र आमच्या टीमच्या खेळाडूंनी चांगला खेळ केला. पॉवर प्लेमध्ये आम्ही चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र नेमक्या त्याचवेळी आमच्या विकेट्स पडल्या. आम्ही सतत विकेट गमावल्या आणि जेव्हा नवीन फलंदाज आले तेव्हा आम्ही दबावात आलो.  

“दुसऱ्या डावात दव पडलं असल्याने बॉल पकडणं आम्हाला कठीण होतं. मी म्हणू शकतो खेळाडूंनी खरोखरच त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न केले. आम्ही आमची फिल्डींग सुधारण्याचा प्रयत्न करू. इतकंच नाही तर आम्ही आमची फलंदाजी सुधारण्याचाही प्रयत्न करू. या सामन्यात आम्ही काय चूक केली यावर आम्ही लक्ष केंद्रित करू, असंही इब्राहिम झदारन असं म्हणालाय.

सिरीजमध्ये टीम इंडियाची आघाडी

मोहालीमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने सिरीजमधील पहिल्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तानचा 6 विकेट्स राखून पराभव केला. अफगाणिस्तानने भारताला 159 रन्सचं लक्ष्य दिले. जे आपल्या खेळाडूंनी 17.3 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केले. शिवम दुबेने 40 बॉल्समध्ये 5 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने नाबाद 60 रन केले.

कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात रोहितने 6 गोलंदाजांचा टीममध्ये समावेश केला होता. यामध्ये अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांनी गोलंदाजी केली.