Live Updates : नवी मुंबईतील नाराज भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांची नाराजी दूर करण्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश

Loksabha Election 2024 Live Updates : पाहा सर्व राजकीय अपडेट्स एका क्लिकवर... कुठे होणार मतदान, विरोधी गटाकडून कोणावर होणार प्रहार... पाहा सविस्तर वृत्त...   

Live Updates : नवी मुंबईतील नाराज भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांची नाराजी दूर करण्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. ज्यानंतर 12 राज्यांतील 94 जागांसाठी मंगळवारी 7 मे रोजी देशभरात मतदान होणार आहे. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास राज्यात 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मंगळवारी मतदान होणार आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गासह पश्चिम महाराष्ट्राचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावण्यापूर्वी शेवटच्या क्षणापर्यंत मातब्बर नेत्यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. 

एकिकडे राज्यात प्रचारतोफाची धग कमी झाली असली तरीही दुसरीक़डे मात्र राजकीय वर्तुळात चाललेली उलथापालथ आणि आरोप प्रत्यारोपांचं सत्र मात्र क्षणाक्षणाला वेगळी रुपं दाखवताना दिसत आहे.  

6 May 2024, 09:29 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : मतदानाच्या दिवशी बाजारपेठा बंद

निवडणूक प्रक्रिया लक्षात घेता मतदानाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील सर्व बाजार बंद राहणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं हे निर्देश देण्यात आल्यामुळं आता तिसऱ्य़ा टप्प्यातील मतदानादरम्यान पुणे जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील. 

6 May 2024, 08:29 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : आज चौथ्या टप्प्यातील अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस 

पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी 3 पर्यंत अर्ड माघारी घेता येणार आहे. शिरुर, अहमदनगर, बीडसह 11 मतदारसंघांमध्ये 13 तारखेला होणार चौथ्या टप्प्यातील मतदान. 

6 May 2024, 08:27 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : महायुतीला घरचा आहेर 

नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपा तून बंडखोरी केलेले अनिल जाधव अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात निवडणूक लढवत आहे त्यांनी रविवारी संध्याकाळी कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा घेत गेल्या दहा वर्षात झालेल्या कामांवर टीका टिपणी केली नाशिक जिल्ह्यातील आर्थिक करणे असलेला शेतकरी नाराज असल्याचाही त्यांनी म्हटल्याने महायुतीला घरातूनच आहेर मिळत आहे. 

6 May 2024, 07:47 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का 

निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटाचे नाराज असलेले विजय कंरजकरांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विजय करंजकर यांनी पक्षप्रवेश केला. विजय करंजकर नाशिकमधून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. यावेळी माझ्याशी विश्वासघात करून गद्दारी झाल्याचं करंजकरांनी म्हटलंय. विजय करंजकर यांच्या प्रवेशाने मविआचे म्हणजेच ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. 

6 May 2024, 07:05 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : शरद पवारांनी कोणाला भरला दम? 

पुण्यातील इंदापूरमधल्या सभेत शरद पवारांनी इंदापूरचे अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांना दम भरला. दुसऱ्यांना निवडणुकीत सहकार्य केलं तर तुमच्या शेतीचं पाणी बंद करु अशी दमदाटी भरणे करत असल्याचं, शेतक-यांनी आपल्याला सांगितल्याचं पवार म्हणाले. यावर तुला सरळ करायला वेळ लागणार नाही अशा इशाराही, पवारांनी भरणेंना दिला. 

6 May 2024, 07:03 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : भाजप म्हणजे बेअकली- उद्धव ठाकरे

भाजप म्हणजे बेअकली, भेकड जनता पार्टी आहे; अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली. नवी मुंबईतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. तसंच शिवसेना नाव आणि पक्ष चिन्हाच्या निकालावरुन त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीकेची झोड उडवली. तर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही शाब्दिक फटकारे लगावले.

6 May 2024, 07:01 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : तिसऱ्या टप्प्यात कुठेकुठे होणार मतदान? 

रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले इथं मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.