Live Updates : नवी मुंबईतील नाराज भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांची नाराजी दूर करण्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश

Loksabha Election 2024 Live Updates : पाहा सर्व राजकीय अपडेट्स एका क्लिकवर... कुठे होणार मतदान, विरोधी गटाकडून कोणावर होणार प्रहार... पाहा सविस्तर वृत्त...   

Live Updates : नवी मुंबईतील नाराज भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांची नाराजी दूर करण्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. ज्यानंतर 12 राज्यांतील 94 जागांसाठी मंगळवारी 7 मे रोजी देशभरात मतदान होणार आहे. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास राज्यात 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मंगळवारी मतदान होणार आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गासह पश्चिम महाराष्ट्राचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावण्यापूर्वी शेवटच्या क्षणापर्यंत मातब्बर नेत्यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. 

एकिकडे राज्यात प्रचारतोफाची धग कमी झाली असली तरीही दुसरीक़डे मात्र राजकीय वर्तुळात चाललेली उलथापालथ आणि आरोप प्रत्यारोपांचं सत्र मात्र क्षणाक्षणाला वेगळी रुपं दाखवताना दिसत आहे.  

6 May 2024, 14:36 वाजता

चित्रपटात जे दाखवल ते खोटं दाखवल आम्ही दुसऱ्या चित्रपटात खर दाखवणार. आनंद दिघे यांना नको नको ते राजन विचारे बोलत होता. दिघे यांचा असली शिष्य कोण तर नरेश आणि नकली शिष्य राजन. आनंद दिघे गेल्यानंतर उध्दव ठाकरे यांना भेटलो तेव्हा मला त्यांनी आनंद दिघे यांची प्रॉपर्टी विचारली तेव्हा खूप वाईट वाटलं- मुख्यमंत्री

6 May 2024, 14:12 वाजता

मोदींच्या सभेच्या गर्दीसाठी 300 रुपये 500 रुपये पुण्यात तर माणसाचा 4 हजार भाव होता.. खोटं बोलणे रेटून बोला असे आमच्या फडणवीस साहेबांचे म्हणणे आहे.- नाना पटोलेंचा आरोप 

6 May 2024, 13:14 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : नाशिकमधून मोठी बातमी 

दिंडोरीतून जे पी गावितांची माघार. नाशिकमध्ये महाविकास आघाडीला दिलासा

6 May 2024, 12:54 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर 

मुंबई, ठाणे लोकसभेसाठी एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर. पक्षातील अनेक कार्यकर्ते नाराज असल्यामुळं त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू. माझ्यातला कार्यकर्ता जीवंत असल्याचं म्हणत कार्यकर्त्यांना हमी. 

6 May 2024, 12:41 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : बारामतीत मतदानासाठी जय्यत तयारी

तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रकिया पार पडणार आहे यासाठी बारामती विधानसभा मतदारसंघात उद्याच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर मतपेट्या ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यासाठी बारामती येथील एमआयडीसी येथील वखार महामंडळ या ठिकाणी नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून जय तयारी करण्यात आली आहे.

6 May 2024, 12:18 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : शरद पवार यांच्या आरोग्यासंदर्भात मोठी अपडेट 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सततच्या सभा आणि दौऱ्यांमुळे दगदग सहन करावी लागली आणि यातून त्यांच्या घशाला त्रास होत असल्याने त्यांचे आज म्हणजे सोमवारचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. डॉक्टरांनी रविवारी त्यांना सक्त विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. दरम्यान आज सकाळी गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी एक रुग्णवाहिका आली होती. डॉक्टरांनी त्यांची आवश्यक अशी तपासणी देखील केल्याचे सांगितले जात असून उद्यापासून शरद पवार हे नियोजित सभा घेऊ शकतील असे सांगितले जात आहे. गेल्या दोन दिवसापासून त्यांचा आवाजही बसलेला होता.

6 May 2024, 12:03 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : भारताची लोकसभा निवडणूक पाहण्यासाठी आले परदेशी पाहुणे 

भारतीय निवडणूक प्रक्रियेची पाहणी आणि अभ्यास करण्यासाठी श्रीलंका, झिंबाब्वे, कझाकिस्तान आणि बांगलादेश या 4 देशांचे 7 प्रतिनिधी भारताच्या दौऱ्यावर आहेत. आज हे प्रतिनिधी मंडळ रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहे. त्यांचे पारंपारिक भारतीय पद्धतीने स्वागत करण्यात आले. अलिबाग येथील मतदान साहित्य वितरण केंद्राला त्यांनी भेट देवून पाहणी केली आणि माहिती घेतली. उद्या जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर भेटी देवून हे प्रतिनिधी मंडळ मतदान प्रक्रियांची पाहणी करणार आहेत. भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्याबरोबर आंतर राष्ट्रीय सहभाग आणि सहकार्यासाठी हा दौरा आयोजित केला आहे. 

6 May 2024, 10:11 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला

घाटकोपरमध्ये गुजराती बहुल सोसायटी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे पॅम्प्लेट्स वाटण्यास कार्यकर्त्यांना मज्जा करण्यात आलाय. या उलट मिहीर कोठेचा यांच्या पॅम्प्लेट्स या सोसायटीत वाटण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी मध्यस्थी करून अखेर या कार्यकर्त्यांना इमारतीत प्रवेश दिला. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद ईशान्य मुंबईत रंगताना दिसतोय.

 

6 May 2024, 09:58 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : नाशिकमधून कोण माघार घेणार?

नाशिक आणि दिंडोरीत आज कोण माघार घेणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. हेमंत गोडसेंविरोधात शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. शांतीगिरी महाराजांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीच्या नेत्यांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मात्र माघार घेण्यास शांतीगिरी महाराजांनी नकार दिलाय. तर भाजपचे बंडखोर अनिल जाधव यांनी हेमंत गोडसेंचं टेन्शन वाढवलंय. समर्थकांचा मेळावा घेत आपण लढण्यावर ठाम असल्याची त्यांनी सांगितलंय.

6 May 2024, 09:30 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : अनिल देसाई यांचा मॉर्निंग वॉक करण्यासोबत 

महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांनी त्यांच्या मतदार संघात असलेल्या शिवाजी पार्क परिसरात मॉर्निंग वॉक करण्यासोबत संवाद साधला.यात युवक,ज्येष्ठ नागरिक महिला,पुरुष यांच्याशी संवाद साधला.शिवाजी पार्क परिसरात माती,धूळ जास्त उडत असल्याने श्वसनाचे विकार होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली असून निवडून आल्यावर कायमस्वरूपी हा प्रश्न निकाली काढणार तसेच कोकणातील निवडणुकीत विनायक राऊत हे च निवडून येतील असा दावा त्यांनी केला आहे.राहुल शेवाळे हे एकेकाळचे सहकारी होते पण त्यानी वेगळा मार्ग निवडला असला तरी जनताच ठरवणार आहे त्यांना कोण पाहिजे, असं देसाई म्हणाले.