Live Updates : नवी मुंबईतील नाराज भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांची नाराजी दूर करण्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश

Loksabha Election 2024 Live Updates : पाहा सर्व राजकीय अपडेट्स एका क्लिकवर... कुठे होणार मतदान, विरोधी गटाकडून कोणावर होणार प्रहार... पाहा सविस्तर वृत्त...   

Live Updates : नवी मुंबईतील नाराज भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांची नाराजी दूर करण्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. ज्यानंतर 12 राज्यांतील 94 जागांसाठी मंगळवारी 7 मे रोजी देशभरात मतदान होणार आहे. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास राज्यात 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मंगळवारी मतदान होणार आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गासह पश्चिम महाराष्ट्राचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावण्यापूर्वी शेवटच्या क्षणापर्यंत मातब्बर नेत्यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. 

एकिकडे राज्यात प्रचारतोफाची धग कमी झाली असली तरीही दुसरीक़डे मात्र राजकीय वर्तुळात चाललेली उलथापालथ आणि आरोप प्रत्यारोपांचं सत्र मात्र क्षणाक्षणाला वेगळी रुपं दाखवताना दिसत आहे.  

6 May 2024, 20:06 वाजता

प्रकृती अस्वस्थमुळे ब्रेक घेतलेल्या शरद पवारांचा पुन्हा झंजावाती दौरा सुरू होणारेय. आठ तारखेपासून शरद पवार अहमदनगर, पुणे, सातारा, बीडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या मतदान केल्यानंतर ते प्रचाराचा धडाका लावणार आहेत. उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतील. काल प्रकृती बिघडल्यानंतर पवारांनी ब्रेक घेतला होता.

6 May 2024, 17:57 वाजता

उद्धव ठाकरे यांचा उद्या  धुळे व जळगाव दौरा...दुपारी तीन वाजता धुळे येथे  महाविकास आघाडी काँग्रेसच्या उमेदवार डॉ शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ सभा घेणार..तर सायंकाळी 7 वाजता  महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाची उमेदवार करन पवार यांच्या प्रचारार्थ जळगावमध्ये सभा

6 May 2024, 17:24 वाजता

माढा लोकसभेत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी दिला मोहिते पाटील यांना पाठिंबा..माढा लोकसभा मतदारसंघात भालके यांना समर्थन करणारे कार्यकर्ते महा विकास आघाडी उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना करणार मतदान..शिवतेज मोहिते पाटील आणि भगीरथ भालके यांची झाली भेट.

6 May 2024, 16:42 वाजता

 सोलापुरात मराठा समाजात वाद, पैसे घेऊन लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदेंना मदत करत असल्याचा मराठा समन्वयकावर आरोप

6 May 2024, 16:20 वाजता

विरोधकांच्या रेल्वेला फक्त इंजिन आहेत. एक राहुल गांधी यांचे इंजिन, शरद पवार यांचे इंजिन, उद्धव ठाकरे यांचे इंजिन, स्टॅलिनचे इंजिन...हे सगळे वेगवगळ्या बाजून जात आहेत त्यामुळे इंजिन जगेवरच आहे.- देवेंद्र फडणवीस 

6 May 2024, 16:08 वाजता

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवारी करणारे अनिल जाधव यांनी अखेर माघारी घेतली आहे. रविवारी संध्याकाळी त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपण मागे हटणार नाही असे स्पष्ट केले होते. मात्र स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पक्षाची शिस्त आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 400 पार लक्ष साध्य करण्यासाठी समजूत घातल्यानंतर अनिल जाधव यांनी शरणागती पत्करली आहे.

6 May 2024, 15:43 वाजता

जळगावात मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून सकाळपासून कार्यकर्त्यांसोबत बंद द्वार बैठकांचा धडाका..तब्बल तीन ते चार तासापासून मंत्री गिरीश महाजन व नेत्याकडून जळगावातील लाडवंजारी सभागृहात बंद द्वार तालुका निहाय कार्यकर्त्यांच्या बैठका..अवघ्या सात दिवसांवर मतदानाची तारीख असल्याने मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून बंद द्वार बैठकीत कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची उजळणी. गाफील राहू नका.कामचुकार पणा करू नका या शब्दात मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कार्यकर्त्यांना सूचना.

6 May 2024, 15:02 वाजता

नाशिकमधून भाजपच्या अनिल जाधवांची माघार,शांतिगीरी महाराज काय भूमिका घेणार? याकडे लक्ष

6 May 2024, 14:59 वाजता

धाराशिव महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर उद्या आठ वाजता गोवर्धन वाडी तालुका जिल्हा धाराशिव येथे मतदान करणार आहेत. आरोग्य मंत्री तानाजी सावंत उद्या साडेसात वाजता मुगाव तालुका परंडा येथे मतदान करणार आहेत. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील ,भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील ,डॉक्टर पदमसिंह पाटील हे उद्या सकाळी 7 वाजता तालुका जिल्हा धाराशिव येथे सकाळी सात वाजता मतदान करणार आहेत. उबाठा गटाचे आमदार कैलास पाटील हे उद्या साडेसात वाजता सांजा तालुका धाराशिव येथे मतदान करणार आहेत.

6 May 2024, 14:44 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : मुंबईतल्या खारदांडा इथे ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आले. ठाकरे गटाचे शाखाप्रमुक चिंतामणी निवटेंनी गद्दार, गद्दार अशी घोषणाबाजी केल्याने दोन्ही गटात वाद निर्माण झाला. महायुतीच उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचार रॅलीवेळी हा प्रकार घडला. यावेळी भाजप नेते आशिष शेलारही उपस्थित होते. आशिष शेलार यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला