T20 World Cup 2022: क्रिकेटमध्ये 'हा' कर्णधार करतो सर्वाधिक कमाई, नेटवर्थ जाणून घ्या

T20 World Cup 2022 : क्रिकेट जगतात 'हे' 8 कर्णधार आहेत सर्वांत श्रीमंत, कोण आहे पहिल्या नंबरवर माहितीय का? 

Updated: Oct 13, 2022, 04:32 PM IST
 T20 World Cup 2022: क्रिकेटमध्ये 'हा' कर्णधार करतो सर्वाधिक कमाई, नेटवर्थ जाणून घ्या title=

पर्थ : T20 World Cup 2022 यंदाच्या टी20 वर्ल्ड कपला येत्या 16 ऑक्टोंबरपासून सुरूवात होत आहे. ऑस्ट्रेलियात (Australia) हा वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या वर्ल्ड कपसाठी सर्वंच संघ झाले आहेत. तत्पुर्वी जाणून घेऊयात टॉप 8 संघाच्या कर्णधारांची कमाई? तसेच या कर्णधारांमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या कर्णधाराचे नाव? नेमका हा कर्णधार कोण आहे, हे जाणून घेऊयात.  

अ‍ॅरॉन फिंच 
ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅरॉन फिंच (Aaron Finch) हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात स्फोटक सलामीवीरांपैकी एक आहे. अलीकडेच त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, परंतु तो टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाची धुरा सांभाळणार आहे. networthey.com नुसार, अॅरॉन फिंचची एकूण संपत्ती $10 दशलक्ष आहे, जी भारतीय चलनानुसार अंदाजे 78 कोटी रुपये आहे.अ‍ॅरॉन फिंच (Aaron Finch)  हा ग्रे-निकोल, प्यूमा, Asics, Callaway Golf, Sony PlayStation आणि Rario NFT सारखे टॉप ब्रँड्चं प्रमोशन करतो. क्रिकेट ऑस्ट्रेलिया सोबतच्या  केंद्रीय कराराव्यतिरिक्त, IPL आणि BBL सारख्या फ्रँचायझी लीगमध्ये तो खेळत असल्याने त्याची कमाई वाढते. 

 

T20 World Cup पुर्वी मोठी खेळी! 'हा' संघ बदलणार कर्णधार 

 

 बाबर आझम 
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) तिन्ही फॉरमॅटमध्ये धावा करत आहे. तो गेल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. 27 वर्षीय बाबर आझम हा पाकिस्तानमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. gqindia.com नुसार बाबर आझमची एकूण संपत्ती 32 कोटी रुपये आहे.बाबर आझम (Babar Azam) केंद्रीय कराराव्यतिरिक्त, पीएसएलमध्ये खेळतो. पीएसएलमधील कराची किंग्जसोबतच्या त्याच्या करारातून 1.24 कोटी रुपये मिळाले. बाबरकडे हेड अँड शोल्डर्स, ओप्पो, एचबीएल, हुआवेई, फ्री फायर, ग्रे निकोल्स आणि क्रेडिट बुक सारखे मोठे ब्रँड आहेत.

केन विल्यमसन
न्यूझीलंडच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या केन विल्यमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वाखाली किवी संघाने 2021 ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली. याशिवाय केनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाचे उपविजेते ठरले आहे. Sportsunfold.com च्या मते, केन विल्यमसनची (Kane Williamson) एकूण संपत्ती $8 दशलक्ष आहे, जी भारतीय चलनानुसार  58 कोटी रुपये आहे. त्याला मुख्य उत्पन्न न्यूझीलंड क्रिकेट बोर्डातून येतो. तसेच आयपीएलमधून खेळताना देखील त्याची मोठी कमाई होते.  Rokit, Powered, Asics, Seagram Royal Stag, Nicholson Auto हे ब्रँड तो प्रमोट करतोय 

जोस बटलर
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) हा सर्वात स्फोटक फलंदाज मानला जातो. caknowledge.com नुसार, जोस बटलरची एकूण संपत्ती $10 दशलक्ष (INR 79.7 कोटी) आहे. 32 वर्षीय खेळाडूने त्याच्या कारकिर्दीत जाहिरात आणि मॅच फीद्वारे मोठी संपत्ती कमावली आहे.जोस बटलर (Jos Buttler) आयपीएलमधून 10 कोटी रुपये घेतो.यासह तो कूकाबुरा, कूपर असोसिएट्स, कॅस्टर, ओप्पो, ड्रीम इलेव्हन सारख्या ब्रँडचा अॅम्बेसेडर देखील आहे.

शाकिब अल हसन
बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) हा अष्टपैलू आणि डावखुरा फलंदाज आहे. शकीब सलग तीन वेळा आयसीसीचा अव्वल खेळाडू ठरला आहे. Borderlessandbeyond.com च्या मते, शाकिबची (Shakib Al Hasan) एकूण संपत्ती $22 दशलक्ष आहे, जे सुमारे 177 कोटी भारतीय रुपये आहे. हा 35 वर्षीय खेळाडू बांगलादेश क्रिकेटचा पोस्टर बॉय आहे, जो लेनोवो, ओप्पो, पेप्सी, कॅस्ट्रॉल, लाइफ बॉय सारख्या ब्रँड्सचा अॅम्बेसेडर देखील आहे.

मोहम्मद नबी
अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी (Mohammad Nabi) हा एक उत्कृष्ट कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने 2021 चा टी20 वर्ल्ड कप खेळला होता. यंदाच्या वर्षी देखील त्याच्या नेतृत्वाखील संघ मैदानात उतरणार आहे. 37 वर्षीय मोहम्मद नबी अफगाणिस्तानच्या प्रसिद्ध ब्रँड्स अजीझी आणि एटिसाल्टचा अॅम्बेसेडर आहे. Popularbio.com च्या मते, मोहम्मद नबीची (Mohammad Nabi) एकूण संपत्ती $1.5 दशलक्ष आहे, जी भारतीय रुपयांमध्ये सुमारे 120 दशलक्ष आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डासोबतच्या केंद्रीय कराराव्यतिरिक्त, अनुभवी अष्टपैलू खेळाडू आयपीएलमधूनही कमाई करतो.

टेम्बा बावुमा
दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट डळमळीत झाले असताना टेम्बा बावुमाकडे (Temba Bavuma) कर्णधारपद सोपवण्यात आले होते. या खेळाडूने आपली कामगिरी चोख बजावली आणि देशात क्रिकेटची पुनर्बांधणी केली. बावुमा त्याचे बहुतांश उत्पन्न केंद्रीय आणि देशांतर्गत करारातून मिळवतो. बावुमा (Temba Bavuma)  स्पोर्ट्स फूटवेअर ब्रँड न्यू बॅलन्सचा ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे. shstrendz.com च्या मते, Bavuma ची एकूण संपत्ती $5 दशलक्ष आहे, जी अंदाजे 39.8 कोटी भारतीय रुपये आहे. 

रोहित शर्मा 
रोहित शर्मा (Rohit sharma) हा टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानला जातो. आयपीएलच्या इतिहासातील तो सर्वात यशस्वी कर्णधार आहे. यासोबत तो टीम इंडियाच्या बॅटींग ऑर्डरची मोठी ताकद आहे. नुकतेच त्याने टी20 वर्ल्ड कपपुर्वी अनेक सीरीज जिंकल्या आहेत. caknowledge.com च्या रिपोर्टनुसार, या अनुभवी कर्णधाराकडे  $24 दशलक्ष (INR 191 कोटी) संपत्ती आहे. या संपत्तीसह रोहित Adidas, Maggi, Nissan, Lays, Oppo, Ceat, Aristocrat, Glenmark, IIFL Finance, Hublot आणि Highlanders यांसारख्या आघाडीच्या ब्रँडचा अॅम्बेसेडर आहे. यासोबतच तो आयपीएल आणि बीसीसीआयचा ए प्लस ग्रेड असलेला खेळाडू देखील आहे.