कान्समध्ये मराठीचा झेंडा; सिद्धार्थ जाधवच्या 'या' सिनेमाचं स्क्रीनिंग

'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सिद्धार्थ जाधवचा 'हजार वेळा शोल पाहिलेला माणूस' चित्रपट दाखवण्यात आला. याचबरोबर १९ मेला देखील दाखवण्यात येणार आहे. 

Updated: May 17, 2024, 02:28 PM IST
कान्समध्ये मराठीचा झेंडा; सिद्धार्थ जाधवच्या 'या' सिनेमाचं स्क्रीनिंग title=

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ जाधव कायमच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो.  'कान फिल्म फेस्टिव्हल २०२४' सध्या जोरदार सुरू आहे. १४ मेपासून सुरू झालेला 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' २५ मेपर्यंत असणार आहे. या फेस्टिवलमध्ये मराठीचा झेंडा रोवला जाणार आहे. कान्स फेस्टिवलमध्ये अनेक मोठ-मोठे कलाकार हजेरी लावत आहेत. कान्सच्या रेडकार्पेटवर बॉलिवूडचेही  अनेक कलाकर झळकले. आलियापासून ऐश्वर्यापर्यंत अनेकांनी कान्सच्या रेडकार्पेटवर हजेरी लावली होती. नुकतीच सिद्धार्थने यासंदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सिद्धार्थ जाधवचा 'हजार वेळा शोल पाहिलेला माणूस' चित्रपट दाखवण्यात आला. याचबरोबर १९ मेला देखील दाखवण्यात येणार आहे. यासंदर्भात पोस्ट करत सिद्धार्थने लिहिलं,'' #आपलामराठीसिनेमा 'कान फिल्म फेस्टिव्हल'बद्दल खूप वेळा ऐकलं होतं. जेव्हा जेव्हा इथे आपला 'मराठी सिनेमा' गेलाय तेव्हा तेव्हा अभिमान वाटायचा. 'कान फिल्म फेस्टिव्हल २०२४'मध्ये 'हजार वेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटाचे स्क्रीनिंग होत आहे आणि मी त्या सिनेमाचा भाग आहे. खूप आनंद झाला आहे.'''कान फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जिथे जगभरातून गौरविलेले सिनेमे येतात आणि बघितले जातात…तिथे आपल्या 'मराठी सिनेमाचं स्क्रीनिंग होत आहे याचा मला खूप आनंद आहे…धन्यवाद 'हजार वेळा शोले पाहिलेला माणूस' चित्रपटाची टीम. खूप छान वाटतंय. असंच प्रेम ठेवा. हा सिनेमा लवकरात लवकर तुमच्यासमोर सादर व्हावा याची मी आतुरतेने वाट पाहतोय…लव्ह यू…थँक्यू...''

सिद्धार्थची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत सिद्धार्थचं अभिनंदन केलंय. एकाने कमेंट करत लिहीलंय की, खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे सिद्धार्थ.....मराठी माणूस, भाषा आणि साहित्य, चित्रपट नाटक अभिमान कायमच आहे. सिद्धार्थ रामचंद्र जाधव...खूप खूप अभिनंदन असाच पुढे जात रहा... तर अजून एकाने लिहीलंय, ढीग प्रेम सिद्धू दादा तर अजून एकाने लिहीलंय, तर अनेकानी त्याला अभिनंदन म्हणत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.