Hardik Pandya : कधी सुधारणार पंड्या? भर सामन्यात अंपायरसोबत केलं असं कृत्य की...; व्हिडीओ व्हायरल

Hardik Pandya Viral Video: नेपाळविरूद्धच्या सामन्यातील एक व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ उपकर्णधार हार्दिक पंड्याचा ( Hardik Pandya ) असून त्याच्या कृत्यावर चाहते मात्र संतापले आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 6, 2023, 11:34 AM IST
Hardik Pandya : कधी सुधारणार पंड्या? भर सामन्यात अंपायरसोबत केलं असं कृत्य की...; व्हिडीओ व्हायरल title=

Hardik Pandya Viral Video: एशिया कपच्या ( Asia Cup 2023 ) सुपर 4 स्टेजचं आता चित्र स्पष्ट झालं आहे. सोमवारी म्हणजेच 4 डिसेंबर रोजी टीम इंडिया ( Team India ) विरूद्ध नेपाळ यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात 10 विकेट्सने नेपाळचा पराभव करत टीम इंडियाने सुपर 4 चं तिकीट मिळवलं. तर या सामन्यातील एक व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ उपकर्णधार हार्दिक पंड्याचा ( Hardik Pandya ) असून त्याच्या कृत्यावर चाहते मात्र संतापले आहेत. 

हार्दिक पंड्याने केला अंपायरशी मस्ती

हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) मैदानावरील अंपायरची खिल्ली उडवताना दिसला. हार्दिक पंड्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर ( Social Media Viral Video ) चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. ही घटना नेपाळीच्या डावादरम्यान घडली. 30 वे ओव्हर संपल्यानंतर पाऊस सुरू झाला. त्यावेळी अंपायरने कव्हर्स बोलावण्याचा निर्णय घेतला. 

पाऊस होता, मात्र टीम इंडिया ( Team India ) अजून मैदानातच होती. यावेळी कव्हर्स मैदानावर आणताच पाऊस थांबला. यानंतर 35व्या ओव्हरच्या सुरुवातीला ही घटना घडली. पाऊस आल्याने अंपायरने स्टंप खाली पाडले. नेपाळचे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते, कव्हर्सही मैदानात आले आणि नंतर पाऊस थांबला. 

यावेळी हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya ) स्वतःवर कंट्रोल ठेवता आले नाही आणि तो अंपायरवर जोरात हसताना दिसला. अंपायरची अवस्था पाहून हार्दिकने ( Hardik Pandya ) त्याला धीर दिला आणि मिठी मारली. दरम्यान अंपायरशी असं वागणं योग्य नसल्याचं म्हणत काही लोकांनी हार्दिकवर टीका केलीये. तर काहीना हार्दिकचा ( Hardik Pandya ) हा व्हिडीओ आवडला असून त्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. 

सुपर 4 मधील सामने-

  • पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश (PAK vs AFG) -  6 सप्टेंबर
  • श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश (SL vs BAN) - 9 सप्टेंबर
  • भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) - 10 सप्टेंबर
  • भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) - 12 सप्टेंबर
  • पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (PAK vs SL) - 14 सप्टेंबर
  • भारत विरुद्ध बांग्लादेश (IND vs BAN) - 15 सप्टेंबर
  • फायनल सामना - 17 सप्टेंबर