महाराष्ट्रातील एकमेव रंगीत समुद्र किनारा; लाल रंगात रंगलेले कोकणातील सर्वात भारी ठिकाण

महाष्ट्रातील लाल रंगाचा समुद्र किनारा... कुठे आहे सुंदर ठिकाण जाणून घेवूया. 

| Apr 21, 2024, 21:51 PM IST

Ladghar Beach : कोकणातील अनेक समुद्र किनारे हे फारसे पर्यटकांच्या परियाचे नाहीत यापैकीच एक आहे तो दापोली येथील  लाडघर समुद्रकिनारा. हा महाराष्ट्रातील एकमेव रंगीत समुद्र किनारा आहे. हा लाल रंगाचा समुद्र किनारा पर्यटकांना मंत्रमुग्ध करुन टाकतो. 

1/7

निसर्गरम्य नयनरम्य कोकण... इथल्या निसर्ग सौंदर्यात पर्यटक हरवून जातात. 

2/7

अतिशय शांत ,सुंदर,स्वच्छ व लांबचलांब किनारा आणि विशेष म्हणजे लोकांची वर्दळ कमी, आजूबाजूला दाट झाडी यामुळे हा समुद्रकिनारा खास ठरतो. 

3/7

या समुद्र किनाऱ्यावरील वाळू लाल रंगाची आहे.  त्यामुळे येथे सूर्यप्रकाशात तसेच पाण्याचे लाल रंगात रिफ्लेक्शन दिसते म्हणून हा समुद्र लाल समुद्र म्हणूनही ओळखला जातो. 

4/7

लाडघर समुद्रकिनाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा समुद्र किनारा लाल रंगाचा आहे. 

5/7

लाडघर समुद्रकिनारा  पुण्यापासून 196 किमी अंतरावर तर मुंबई पासून 227 किमी अंतरावर आहे.   

6/7

कोकणात रत्नागिरी जिल्ह्या मुबई गोवा हायवेलगत असलेल्या दापोली तालुक्यात लाडघर समुद्रकिनारा आहे. 

7/7

कोकणातील प्रत्येक समुद्र किनारा हा अनोखा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. यापैकीच एक आहे तो लाडघर समुद्रकिनारा.