पॅट कमिन्सने पुन्हा काढली रोहितच्या जखमेवरची खपली, वर्ल्ड कप फायनलच्या आठवणीत म्हणाला...

Pat cummins On WC 2023 : सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स याने वर्ल्ड कप फायनलच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत. इन्टाग्रामवर कमिन्सने पुन्हा फायनलचा फोटो शेअर केला अन् रोहितच्या जखमेवरची खपली काढली.  

| Apr 14, 2024, 20:04 PM IST

Pat cummins share favorite memory in india : ऑस्ट्रेलियाने भारतात येऊन टीम इंडियाचा पराभव केला अन् वर्ल्ड कपवपर नाव कोरलं होतं. पॅट कमिन्सने त्याची आठवण पुन्हा शेअर केली आहे.

1/7

पॅट कमिन्सने आगामी सामन्याला वेळ असल्याने सोशल मीडियावर थोडा वेळ घालवला. त्यावेळी त्याने इन्स्टाग्रामवर काही स्टोरी शेअर केल्या आहेत.

2/7

चाहत्यांच्या प्रश्नाची उत्तरं देताना पॅटने काही आठवणी शेअर केल्या. सनरायजर्स हैदराबादच्या ड्रेसिंग रुममधील आवडता खेळाडू कोण? असा सवाल त्याला विचारण्यात आला.

3/7

त्यावेळी त्याने ट्रेविड हेडचा फोटो शेअर केला. त्यानंतर एका चाहत्याने त्याला भारतातील सर्वात आवडती आठवण काय? असा प्रश्न विचारला.  

4/7

चाहत्याच्या या प्रश्नावर पॅटने प्रत्येक भारतीयाच्या मनाला टोचणारा तो फोटो शेअर केला. ऑस्ट्रेलिय खेळाडूंनी उंचावलेला फोटो पॅटने शेअर केलाय.

5/7

वर्ल्ड कप 2023 ची फायनल इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाली होती. त्यावेळेस ऑस्ट्रेलियन संघाने कमालीचे प्रदर्शन दाखवत भारतीय संघाला एकतर्फी पराभूत केलं होतं. 

6/7

त्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि ट्रॅविस हेड यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकवून दिला होता. 

7/7

'मला एवढ्या जास्त लोकांसमोर चांगलं प्रदर्शन करायला आवडतं आणि यासोबतच दमदार प्रदर्शनाच्या जोरावर मला दुसऱ्या संघाच्या चाहत्यांना शांत करायला सुद्धा आवडतं', असं पॅट कमिन्स म्हणाला होता.