महाराष्ट्रातील निर्मनुष्य समुद्र किनारा; इथपर्यंत पोहचताना वाटेत गाठू शकतो वाघ

 गणेशगुळे समुद्र किनाऱ्याचे विलोभनीय दृष्य पर्यटकांना मोहित करुन टाकते. 

| Apr 20, 2024, 23:03 PM IST

Ganeshgule Beach : कोकणात असे अनेक समुद्र किनारे आहेत जे फारसे पर्यटकांच्या परिचयाचे नाहीत. यापैकीच एक आहे तो रत्नागिरी शहरापासून अगदी जवळ असलेला गणेशगुळे हा समुद्र किनारा. जाणून घेवूया या समुद्र किनाऱ्याविषयी.

1/7

कोकणातील गणेशगुळे हा समुद्र किनारा एका गावात दडलेला सुंदर समुद्र किनारा आहे. 

2/7

येथे गणेशगुळे हे गणपतीचे जागृत देवस्थान आहे. गणपतीपुळेतील गणपतीचे मूळस्थान म्हणूनही गणेशगुळेची ओळख आहे.

3/7

 जिथे गणेशगुळे गाव संपते तेथेच अथांग समुद्र किनारा नजरेस पडतो. पांढऱ्या वाळूचा हा समुद्र किनारा अतिशय सुंदर आहे. आजूबाजूला असलेल्या हिरव्यागार टेकड्या या समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यात भर घालतात.   

4/7

गणेशगुळे गाव फार मोठे नाही. मात्र, गावात जाणारा रस्ता हा गर्द झाडीतून जातो. गावात जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्या वाघाचा वावर असतो असे गणेशगुळे गावचे ग्रामस्थ सांगतात. 

5/7

 रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र अशी ओळख असलेल्या पावस येथून राजापूरकडे जाणाऱ्या फाट्यावर उजवीकडे गणेशगुळे हे गाव आहे. 

6/7

रत्नागिरी शहरापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर गणेशगुळे हे गाव आहे. रत्नागिरी बस डेपोतून गणेशगुळे येथे जाण्यासाठी थेट एसटी बस आहे. 

7/7

गणेशगुळे गावात हा समुद्र किनारा आहे. या गावाच्या नावावरुनच हा समुद्र किनारा गणेशगुळे या नावाने ओळखला जातो.