VIDEO : नारायण राणेंची खासदारकीही जाऊ शकते; 'खुपते तिथे गुप्ते' मध्ये संजय राऊतांच्या वक्तव्यानं एकच खळबळ

Sanjay Raut Khupte Tithe Gupte : संजय राऊत यांनी नुकतीच खुपते तिथे गुप्ते या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि ठाकरे कुटुंबासोबत कसे नाते आहे हे सांगितले. इतकंच नाही तर त्यांनी नारायण राणेंनी केलेल्या आरोपावर सडेतोड उत्तर दिलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 23, 2023, 10:48 AM IST
VIDEO : नारायण राणेंची खासदारकीही जाऊ शकते; 'खुपते तिथे गुप्ते' मध्ये संजय राऊतांच्या वक्तव्यानं एकच खळबळ title=
(Photo Credit : File Photo)

Sanjay Raut Khupte Tithe Gupte : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोची. हा शो आपल्याला झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळत आहे. या शोचा तिसरा सीझन पाहण्यास प्रेक्षकांना चांगलाच आनंद होत आहे. सतत वादात असणाऱ्या या सीझनमध्ये आता खासदार संजय राऊत हे पाहायला मिळत आहेत. त्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

संजय राऊत यांनी हजेरी लावलेला हा प्रोमो चांगलाच व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमात संजय राऊत हे महाराष्ट्रातील राजकारणावर बोलताना दिसणार आहेत. इतकंच नाही तर त्यांचं आणि ठाकरे कुटुंबाचं नातं, बाळा साहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विषयी अनेक गोष्टी बोलताना दिसत आहेत. दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये संजय राऊत हे कार्यक्रमात आले असता त्यांना नारायण राणे यांची एक क्लिप दाखवण्यात आली. या क्लिपमध्ये नारायण राणे बोलताना दिसतात की बाळासाहेबांनी संजय राऊत यांना खासदार करायचं असं मला सांगितलं होतं. शोमध्ये त्यांनी त्यावेळी नेमकं काय घडलं होतं त्याचा घटनाक्रमच सांगितला आहे. एक दिवशी संध्याकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी मला मातोश्रीवर बोलावून घेतलं. दुसऱ्या मजल्यावर मी गेलो, तिथं संजय राऊत बसले होते. बाळासाहेब म्हणाले, आपल्याला याला खासदार बनवायचा आहे. फॉर्म भरुन टाक, असं नारायण राणे शोमध्या सांगताना दिसतात.

नारायण राणे पुढं म्हणतात की, "मी संजय राऊत यांना दुसऱ्या दिवशी कागदपत्र घेऊन ऑफिसला यायला सांगितलं. ते आले, पाहिलं तर मतदार यादीत त्यांचं नावच नाही. पण बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं, आणि त्यांचा शब्द माझ्यासाठी अखेरचा", हा प्रसंग नारायण राणे यांनी सांगितला होता. 

पुढे नारायण राणे याविषयी सांगताना म्हणाले की "संजय राऊत यांना खासदार करणं हे माझं पाप आहे. यांच्यासारखा खोटं बोलणारा, स्वार्थी माणूस जगात नाही. हेराफेरी करण्यासाठी ते शिवसेनेत आले. यांचं काय योगदान आहे? पोलीस काढा आणि मुंबईत पाच पावलं चालून दाखवा, असं ओपन चॅलेंज नारायण राणे यांनी संजय राऊत यांना दिलं होतं."

हेही वाचा : गुलशन कुमार यांच्या हत्येच्या 26 वर्षानंतर मोठा खुलासा, 'या' अभिनेत्याला घेतलं होतं पोलिसांनी ताब्यात

दरम्यान, नारायण राणे यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया देत म्हणाले, "हे महाशय खोटं बोलतायत. माझा मतदार नोंदणी क्रमांक मी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर त्यांची खासदारकीही जाऊ शकते', अशा शब्दांत राऊत यांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे." तर हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.