नाशिककरांची हक्काची पुणे-नाशिक हुतात्मा एक्सप्रेस आता 'या' स्थानकातून सुटणार, कसा असेल रूट? जाणून घ्या

Pune Bhusawal Express Route Change: गोल्डन ट्रँगल म्हणून नाशिक पुण्याला जोडणारी पुणे-नाशिक हुतात्मा एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती मात्र या ट्रेनला नंतर जळगावहून सुरुवात करण्यात आली होती त्यानंतर ती थेट आता विदर्भात नेली आहे. जाणून घ्या कसा असेल रूट, वेळापत्रक ...  

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 8, 2023, 01:02 PM IST
नाशिककरांची हक्काची पुणे-नाशिक हुतात्मा एक्सप्रेस आता 'या' स्थानकातून सुटणार, कसा असेल रूट? जाणून घ्या  title=
pune nashik bhusawal train divert will now run from amravati via manmad daund

Nashik Pune Train Express: नाशिककरांची हक्काची असलेली नाशिक-पुणे ट्रेन मध्य रेल्वेने थेट विदर्भात नेल्याचे जाहीर केले आहे. विदर्भातील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने हे दिवाळीचे गिफ्ट दिले असले तरी नाशिककरांनी मात्र मध्य रेल्वेच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. 

नाशिककरांसाठी पुण्याला जाण्याकरिता आरामदायी असलेल्या पुणे-नाशिक-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस आता अमरावतीहून सुटणार आहे. गोल्डन ट्रँगल म्हणून नाशिक पुण्याला जोडणारी ही ट्रेन सुरू करण्यात आली होती. नाशिककरांना पुण्याला जाण्यासाठी मनमाड किंवा कल्याणला जावे लागत होते. नाशिककरांच्या अथक प्रयत्नानंतर पुणे-नाशिक-भुसावळ ही ट्रेन सुरू झाली होती. 

गोल्डन ट्रँगल म्हणून नाशिक- पुण्याला जोडणारी ही ट्रेन सुरू करण्यात आली होती. मात्र या ट्रेनला नंतर जळगावहून सुरू करण्यात आली होती. त्यानंतर ती थेट आता विदर्भात नेल्यामुळे नाशिककर नाराज झाले आहेत. या निर्णयाच्या विरोधात आज नाशिककर प्रवाशांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करत प्रवास केला. मुंबईला दररोज ये जा आणि पुण्याला प्रवास करणाऱ्यांसाठी ही गाडी महत्त्वाची होती. 

पुणे-भुसावळऐवजी आता ही गाडी पुणे-अमरावती अशा नावाने धावणार आहे. उरळी, दौंड कोरड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा येथे ती थांबेल. 

नाशिककरांची पुणे-भुसावळ ही गाडी दौंड, अहमदनगर, मनमाडमार्गे अमरावतीपर्यंत नेण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयानेही याला मंजुरी दिली आहे. पुणे भुसावळऐवजी ही गाडी पुणे-अमरावती अशा नावाने धावणार आहे. यापूर्वी पुणे-नाशिक- भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस पुणे-भुसावळ-पुणे व्हाया नाशिक, पनवेल, कर्जत अशी धावत होती. मात्र आता या एक्सप्रेसचा मार्ग बदलल्यामुळं भुसावळच्या पुढे अमरावतीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळं नाशिकरोड, लासलगाव, निफाड, कल्याण, पनवेल ते पुणे लिंकवरील प्रवाशांच्या आणि विशेषत: नाशिक-पुणेदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गाडीच राहणार नाही. आता रस्तेमार्गाने पुणे गाठणे हा एकच पर्याय राहणार आहे. रेल्वेच्या या निर्णयाने नाशिककर नाराज झाले आहेत.