प्रवासात तापाने फणफणलात? रेल्वेच्या 'या' App वरुन मागा मदत, ट्रेनमध्ये लगेच येतील डॉक्टर

Rail Madat App User Guid: रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. प्रवासादरम्यान काही समस्या आढळल्यास काय कराल? जाणून घ्या.

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 13, 2023, 12:19 PM IST
प्रवासात तापाने फणफणलात? रेल्वेच्या 'या' App वरुन मागा मदत, ट्रेनमध्ये लगेच येतील डॉक्टर title=
Indian Railways Rail Madad app is empowering passengers know how to use

Rail Madat App: रेल्वेतून प्रवास करत असताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी रेल्वेतील सीट खराब असतात, प्रसाधनगृहातील अस्वच्छता तर कधी फेरीवाल्यांची घुसखोरी, असा अनेक तक्रारींचा सामना प्रवाशांना करावा लागतो. प्रवाशांच्या या अडचणी सोडवण्यासाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने (Indian Railway) उपाय काढला आहे. प्रवाशांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी रेल्वे सूचना प्रणाली केंद्राने 'रेल मदद' (Rail Madat App) हे मोबाइल अॅप विकसित केले आहे.  हे अॅप कसे सुरु करावे याचा थोडक्यात आढावा. 

मेल-एक्स्प्रेसमधील एसी डब्यांमध्ये अस्वच्छता, महिला डब्यात पुरुष प्रवासी व फेरीवाल्यांची घुसखोरी अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर प्रवाशात ताप भरला किंवा अचानक तब्येत बिघडते. अशावेळी कोणाची मदत घ्यायची असा प्रश्न पडतो. तर, याचंही उत्तर तुम्हाला रेल मदत अॅपमध्ये मिळणार आहे. रेल मदत अॅपमध्ये मेडिकल इमरजन्सीसाठीही मदत मिळणार आहे. तर हे अॅप कसं वापराल जाणून घेऊया. 

वैद्यकीय सुविधा मिळणार

रेल मदत अॅपमध्ये प्रवाशांना फोटोसह (५एमबीपर्यंत) तक्रार अपलोड करता येणार आहे. त्याचबरोबर प्रवासाचा तपशील, तारीख, वेळ वार ही माहिती नोंदवता येण्याची सोय अॅपमध्ये देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना प्रवासात तत्काळ मदत मिळावी म्हणून वैद्यकीय मदतीसाठीही एक क्रमांक देण्यात आला आहे. १३९ या क्रमांकावर डायल करुन तुम्ही वैद्यकीय सुविधा मिळवू शकणार आहात. 

अॅपचा वापर कसा कराल

'रेल मदद' प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे

 स्टोअरमधून डाऊनलोड केल्यानंतर या अॅपमध्ये 'लॉग इन' आणि 'साईन अप' या पर्यायांवर क्लिक कराल.

एकदा लॉग इन केल्यानंतर सर्वसामान्यांना या अॅपची सुविधा घेता येणे शक्य आहे.

दिव्यांग आणि महिलांसाठी विशेष सुविधा

ट्रेनमध्ये कोणीतीही अडचण आल्यास तुम्ही तक्रार करु शकता 

रेल्वे मदत अॅपचा वापर तुम्ही मोबाइल आणि वेब प्लॅटफॉर्मवरुनही करु शकता. तसंच, अॅपवरुन तक्रार दाखल केल्यानंतर तुमच्या तक्रारीचे पुढे काय झाले तक्रारीचे निवारण झाले का? याचे रीअल टाइम ट्रॅकिंगही करु शकणार आहात.