उत्तम आरोग्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत आहारात असू द्यात 'या' भाज्या

Health Tips In Marathi: उन्हाळ्यात जास्त तेलकट, तूपकट पदार्थ खावू नये कारण त्यामुळं पचनासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. अशावेळी आहार कसा असावा, जाणून घ्या  

मानसी क्षीरसागर | Updated: May 16, 2024, 04:51 PM IST
उत्तम आरोग्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत आहारात असू द्यात 'या' भाज्या title=
eat these Green Vegetables in summer body will remain fit and healthy

Health Tips In Marathi: उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्याची काळजी घेणे हे खूप आव्हानात्मक असते. कारण या दिवसांत बद्धकोष्ठता, गॅस, मळमळ आणि अॅसिटीडी यासारखे छोटे-मोठे आजार डोकं वर काढतात. कारण या मोसमात शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास त्याचा आपल्या शरीरावर मोठा परिणाम होतो. त्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे खूप गरजेचं असते. या मोसमात काही भाज्यांचे सेवन करणे खूप गरजेचे असते आणि या भाज्यांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी आणि पोषकतत्वे असतात. जे शरीरासाठी फायदेशीर असतात. जाणून घेऊया उन्हाळ्यात कोणत्या भाज्या आहारात सामील करणे फायद्याचं ठरु शकतं. 

काकडी 

उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळं डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. अशावेळी लोक त्यांच्या डाएटमध्ये विविध प्रकारचे फुड आयटम सामील करु शकतात. जे पाण्याची कमतरता भरुन काढू शकतात. काकडीमध्ये पाणी भरपूर असते जे डिहायड्रेशनची समस्या दूर करु शकतात. 

शेवग्याच्या शेंगा

शेवग्याच्या शेंगा व या झाड्याच्या प्रत्येक भाग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात अँटीबायोटिक आणि अँटी बॅक्टेरीयल गुण असतात. जे तुम्हाला कित्येक प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचाव करतात. ही भाजी फायबरने परिपूर्ण असते. उन्हाळ्याच्या दिवसांत थकवा व अशक्तपणाची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही शेवग्याच्या शेंगा बरोबर शेवग्याच्या पानांचे सेवनही करु शकता. 

कारले

कारले जरी कडू असते तरी ते आरोग्यासाठी अमृतापेक्षा काही कमी नाहीये. कारल्यात भरपूर व्हिटॅमीन, आयर्न, झिंक, पोटॅशियम, मॅगनीजसारखे तत्व आढळतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ही भाजी खूप उपयुक्त आहे. इतकंच नव्हे तर, कोलेस्ट्रॉलचा स्तरदेखील ही भाजी कमी करण्यास मदत करते. 

दोडका

दोडका उन्हाळ्याच्या दिवसांत भरपूर उपलब्ध असतो. या भाजीत मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन असतात. जर तुम्हाला पाचनसंबंधी काही त्रास असेल तर तुमच्या आहारात शिराळ्याची भाजी आवश्यक समावेश करा. त्या व्यतिरिक्त यात असलेले एजाइम पचनासाठी मदत करते ते आतड्यांसाठी फायदेशीर ठरते. 

दुधी

दुधी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दुधीमध्ये अनेक पोषक तत्वे आढळले जातात जे शरीराला मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. तसंच, उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनपासूनही बचावतो. तसंच, यात अनेक प्रकारचे औषधी गुण आढळले जातात. जे तुम्हाला अनेक गंभीर आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)