'लग्नाची पत्रिका छापली, कपडे घेतले, दागिने बनवले अन्...'; म्हणून 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं लग्न मोडलं

Marathi Actress Broke Marriage Before Wedding Date : या मराठमोळ्या अभिनेत्रीनं लग्नाच्या एक महिन्या आधी का दिला लग्न करण्यास नकार... स्वत: केला खुलासा

दिक्षा पाटील | Updated: May 9, 2024, 10:58 AM IST
'लग्नाची पत्रिका छापली, कपडे घेतले, दागिने बनवले अन्...'; म्हणून 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं लग्न मोडलं title=
(Photo Credit : Social Media)

Marathi Actress Broke Marriage Before Wedding Date : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिंदे ही तिच्या अंगूरी भाभी या भूमिकेसाठी ओळखली जाते. 'भाभी जी घर पर है' या मालिकेतील तिच्या या भूमिकेनं प्रेक्षकांची मने जिंकली. आता शिल्पा शिंदे ही 'खतरों के खिलाडी 14' या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार असल्याचे म्हटले जाते. दरम्यान, अजून याविषयी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शिल्पा शिंदे ही तिच्या कामासोबतच तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. शिल्पा 46 वर्षांची आहे, तर तिनं अजून लग्न केलं नाही. पण तुम्हाला माहितीये का? शिल्पाचं लग्न होणार होतं मात्र, ऐनवेळी तिनं लग्न मोडलं.

शिल्पा शेट्टी ही अभिनेता रोमित राजसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनी 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या मायका या मालिकेत काम केलं होतं. त्याच मालिकेच्या सेटवर ते दोघं रिलेशनशिपमध्ये आले. त्यानंतर त्यांचा साखरपुडा देखील झाला. मग काय लग्नाची तयारी देखील झाली, पण मग अचानक त्यांचं लग्न तुटलं. त्याविषयी स्वत: शिल्पानं सांगितलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शिल्पानं एका मुलाखतीत सांगितलं की "मी माझ्या लग्नासाठी सर्वकाही सोडलं. एक मुलगी म्हणून मला माहित होतं की माझा पती आणि त्याच्या कुटुंबासाठी माझ्या काय जबाबदाऱ्या आहेत. मी त्या हिशोबानं सगळं काही करायचे. मी त्याच्या सगळ्या कुटुंबातील लोकांनाचा विचार करायचे पण त्यांच्या माझ्याकडून जरा जास्तच अपेक्षा होत्या. माझ्या लग्नाची तयारी झाली होती. माझा लग्नाचा ड्रेस देखील तयार होता. मी दागिने देखील खरेदी केले होते. लग्नाच्या पत्रिका छापल्या होत्या. सगळ्यात वाईट म्हणजे एक महिन्या आधी मी लग्न मोडलं. पण मला वाटतंकी हा योग्य निर्णय होता. मला खूप आनंद आहे की मला आणखी एडजस्टमेंट्स करण्याची गरज पडली नाही. आता मी माझे निर्णय स्वत: घेऊ शकते."

रोमितविषयी बोलायचे झाले तर त्यानं 2010 मध्ये टीना कक्कडशी लग्न केलं. तर शिल्पानं अजून लग्न केलं नाही. शिल्पाचे लाखो चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर शिल्पाला 676K चाहते फॉलो करतात. दरम्यान, लवकरच शिल्पा ही 'खतरों के खिलाडी 14' या शोमध्ये दिसणार आहे. यावेळी तिच्यासोबत गश्मीर महाजनी देखील दिसणार असल्याचे म्हटले जाते.