Sindhudurg Raj Thackeray : कणकवलीच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Sindhudurg Raj Thackeray : कणकवलीच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा

4 May 2024, 22:45 वाजता

अडीच वर्ष मान्य केली असती तर बोलले असते?- राज ठाकरेंचा उद्धव यांना सवाल

 

Sindhudurg Raj Thackeray : सिंधुदुर्गमधल्या कणकवलीतील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. समजा तुम्हाला अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद मिळालं असतं तर आज जे तुम्ही बोलताय ते बोलला असतात का, असा थेट सवाल राज यांनी यावेळी केला. रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. कामाला वाघ म्हणजे नारायण राणे अशी प्रशंसा त्यांनी केली. तसंच फक्त 6 महिन्यांचं मुख्यमंत्रिपद मिळालेल्या राणेंना 5 वर्षं मुख्यमंत्रिपद मिळालं असतं, तर आता इथे कोणाला प्रचाराला यायची गरजच लागली नसती असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तर 10 पैकी साडेसात वर्षं उद्धव ठाकरे सत्तेत असताना, प्रकल्प राज्याबाहेर का गेले असा सवालही त्यांनी केला. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

4 May 2024, 22:18 वाजता

मोदीजी तुम्ही स्वत: महाराष्ट्रावर संकट आहात...स्वत:ला आवर घाला- उद्धव ठाकरे

 

Dharashiv Uddhav Thackeray : धाराशिवच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केलीये...मी रुग्णालयात असताना पाव मुख्यमंत्री आणि गद्दार कटकारस्थानं करत होते...मोदीजी तुमच्यावर संकट आलं की मी धावून येईल...तर मोदीजी तुम्ही स्वत: महाराष्ट्रावर संकट आहात...स्वत:ला आवर घाला...अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मोदींना सल्ला दिलाय...तर आता जनताच सिंघम म्हणत, आता माझी सटकली हा डायलॉग उद्धव ठाकरेंनी मारला.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

4 May 2024, 18:39 वाजता

नारायण राणेंच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची जाहीर सभा

 

Raj Thackeray in Sindhudurg : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल.. बांदा येथे राज ठाकरे दाखल होताच भाजप व मनसैनिकांकडून जल्लोषात स्वागत.. राज ठाकरेंवर जेसीबीतून फुलांची उधळण.. ढोल ताशा आणि फटाके फोडून राज ठाकरे यांचं जंगी स्वागत. राज ठाकरे यांची महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर नारायण राणेंसाठी पहिलीच जाहीर सभा.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

4 May 2024, 17:30 वाजता

पोलीस कोठडीत अनुज थापनची हत्या- कुटुंबीयांचा आरोप

 

Salman Khan Case Update : सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतलीय. आरोपी अनुज थापनची पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केलाय. याची CBIकडून चौकशी करा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी मुंबई हायकोर्टाकडं केलीय. दरम्यान अनुज थापनचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याच्या कुटुंबीयानी होकार दर्शवलाय. आज मृतदेह विमानाने पंजाबला पाठवलं जणारेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

4 May 2024, 14:43 वाजता

'...हे आता घरगडी समजतात',मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

 

Eknath Shinde on Uddhav Thackeray : मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेत होणा-या पक्षप्रवेशावरून ठाकरेंना टोला लगावलाय...आमचे विचार पटतात त्यामुळे आमच्याकडे दररोज पक्षप्रवेश होतात...तिकडे मालक नोकरासारखे वागवत होते...बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजत होते...आता हे घरगडी समजतात...असा टोला ठाकरेंना लगावलाय...तर मविआत गोंधळाची परिस्थिती असल्याचं शिंदेंनी म्हटलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

4 May 2024, 13:56 वाजता

'काँग्रेससमोर लोटांगण घातले ते गद्दर', दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

 

Deepak Kesarkar on Uddhav Thackeray : बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेससमोर लोटांगण घातले ते गद्दार आहेत असा टोला दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय...कॉमन मिनिमम प्रोग्रामवर बाळासाहेबांनी सही केली असती का? असा सवाल विचारत भावनेच्या भरात वाहत जाऊ नका...ज्याने 4 वेळा पक्ष फोडला त्यालाच तुम्ही निवडून देणार का? असाही सवाल केसरकरांनी विचारलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

4 May 2024, 13:07 वाजता

'जरांगेंना सोबत घेण्याचा प्रस्ताव मविआला दिला होता', प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

 

Prakash Ambedkar on Manoj Jarange : प्रकाश आंबेडकरांनी जरांगे-पाटलांबद्दल मोठा दावा केलाय.. जरांगे पाटलांना सोबत घेण्याचा प्रस्ताव मविआला दिला होता, मात्र जरांगेंचं नाव घेताच मिठाचा खडा पडल्यासारखं नेत्यांचं तोंड झालं.. असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकरांनी केलाय.. 
 

4 May 2024, 13:02 वाजता

संजय राऊतांची शिंदे-फडणवीसांवर टीका

ठाण्यात महायुतीच्या रॅलीत गुंड टोळ्या सहभागी झाल्या होत्या. ठाणे, डोंबिवलीतील अनेक टोळ्या मिळून पक्ष निर्माण झालाय...गुंडांना तुरुंगातून सोडून त्यांचा वापर राजकारणासाठी केला जातोय...आणि राज्याचे गृहमंत्री डोळ्याला पट्टी बांधून बसलेत असा गंभीर आरोप संजय राऊतांनी शिंदे, फडणवीसांवर केलाय...

 

4 May 2024, 12:32 वाजता

भोर तालुक्यात टपाली मतदान सुरु

 

Bhor Election Postal Voting : बारामती मतदारसंघातील भोर तालुक्यात टपाली मतदान सुरु झालंय.. विविध जिल्ह्यातील भोर तालुक्यात कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदानाची प्रक्री सुरु करण्यात आलीये.. पुढील दोन दिवस शासकीय कर्मचा-यांसाठी हे मतदान घेतलं जाणार आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

4 May 2024, 12:13 वाजता

'अमोल कोल्हे भाजपच्या तिकीटावर लढण्यास इच्छुक होते', प्रवीण दरेकरांचा मोठा गौप्यस्फोट

 

Pravin Darekar on Amol Kolhe : शिरुरमध्ये एकीकडे अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव असा सामना सुरु आहे तर दुसरीकडे प्रवीण दरेकर विरुद्ध अमोल कोल्हे यांच्यात जुंपलीय.. अमोल कोल्हे भाजपचं कमळ हाती घेऊन लोकसभेसाठी इच्छुक होते असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी केलाय. तर दरेकरांकडे इतकी चांगली विनोदबुद्धी आहे याची कल्पना नव्हती असा टोला कोल्हेंनी दरेकरांना लगावलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-