बाप चोरला, पक्ष चोरला, गजनी, अर्धवटराव, आणि... ठाकरेंच्या होमग्राऊंडवर देवेंद्र फडणवीस यांचा शाब्दिक हल्ला

शिवाजी पार्क येथील सभेत उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी होमग्राऊंडवरच उद्धव ठाकरे यांच्यावर  शाब्दिकहल्ला केला आहे.  

Updated: May 17, 2024, 08:18 PM IST
बाप चोरला, पक्ष चोरला, गजनी, अर्धवटराव, आणि... ठाकरेंच्या होमग्राऊंडवर देवेंद्र फडणवीस यांचा शाब्दिक हल्ला  title=

Mahayuti Rally Shivaji Park Mumbai : शिवाजी पार्क मैदानात महायुतीच्या हायव्होल्टेज सभेत उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी होमग्राऊंडवरच उद्धव ठाकरे यांच्यावर  शाब्दिकहल्ला केला आहे.  बाप चोरला, पक्ष चोरला, गजनी, अर्धवटराव असे शब्द वापरल्याशिवाय उद्धव ठाकरे यांचे भाषण होत नाही.

मला बाळासाहेब ठाकरे यांची गर्जना आठवतेय जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो. काल परवा उद्धव ठाकरे देखील ही घोषणा देत होते... आता इंडिया आघाडीमुळे देत नाही अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. 
कोरोना काळात मोदींनी देशाला कोविड लस दिली. मोदी कोविड लस देत होते.... तेव्हा उद्धव ठाकरे खिचडी घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा करत होते असा घणाघाची आरोप देखील  देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

आता उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून बाप चोरला, घरी बसून काम करणार, गझनी, माझं कुटुंब माझी जबाबदारी यापलिकडे काही ऐकायला येत नाही”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

यांनी फक्त घोटाळे केले

 कोरोना काळात मोदींनी देशाला कोविड लस दिली. मोदी कोविड लस देत होते.... तेव्हा उद्धव ठाकरे खिचडी घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा करत होते असा घणाघाची आरोप देखील  देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

वाझेला परत घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा दबाव होता

तुम्ही जर वसुली करार तुचेच लोक तुमचेच पोलिस बॉम्ब ठेवण्याचे काम करतील. उद्धव ठाकरेंचा दबाव होता. वाझेला परत घ्या. मी म्हंटल वाझेला परत घेणार नाही. त्यांनी वाझेला परत घेतले. मला विचारतता वाझे काय लादेन आहे का? उज्वल निकम यांना तिकीट दिल्यावर काँग्रेसवाले मतांकरिता शहिदांचा अपमान करत आहेत. 

महायुतीने मुंबईचा विकास केला

मोदींच्या नेतृत्वात महायुती तयार झाली आहे. महायुतीने मुंबईचा विकास केला. मुंबईचा चेहरा  बदलला.  मेट्रो, अटल सेतू, धारावीचा विकास केला. तुम्ही काय केले. एक तरी काम दाखवा”, असं चॅलेंज देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.