सलमान खानला करायचं होतं 'हिरामंडी' सिनेमातील 'या' अभिनेत्रीसोबत लग्न

काही दिवसांपुर्वी हिरामंडी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. हा सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे.

Updated: May 17, 2024, 06:41 PM IST
सलमान खानला करायचं होतं 'हिरामंडी' सिनेमातील 'या' अभिनेत्रीसोबत लग्न title=

मुंबई : अभिनेत्री शर्मीन सहगल सध्या हीरामंडी - द डायमंड बाजार या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे चर्चेत आहेत.  संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हीरामंडी - द डायमंड बाजार या सिनेमाने सध्या सगळीकडे धुमाकूळळ घातला आहे.  शर्मीन सहगलने या सिनेमात आलमजेबची भूमिका साकारली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखातीत तिने खुलासा केलाय की, ती अनेकदा तिच्या मामाच्या म्हणजेच संजय लीला भन्साळी यांच्या सेटवर जायची. अभिनेत्रीने असंही सांगितलं की, तिला सलमान खानने लग्नासाठी प्रपोज केलं होतं. तिचं हे वक्तव्य ऐकून सगळेच चांगलेच हैराण झाले आहेत. 

नुकतीच शर्मीन सहगलने झूमला मुलाखतीत अनेक खुलासे केले आहे. यावेळी अभिनेत्रीला तिला सगळ्यात पहिल्यांदा भेटलेल्या सेलिब्रिटीचं नाव विचारण्यात आलं. यावर बोलताना शर्मीन म्हणाली,  मी सगळ्यात पहिल्या अभिनेत्याला भेटली तो म्हणजे, सलमान खान होता, ज्याला ती संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हम दी दे चुके सनम' या चित्रपटाच्या सेटवर भेटली होती, जेव्हा ती दोन वर्षांची होती.

सलमान खानने शर्मीनला लग्नासाठी प्रपोज केले होते
शर्मीन पुढे म्हणाली की, ''मी 2-3 वर्षांची होते, आणि तो मला असा म्हणाला की, तू माझ्याशी लग्न करशील का? आणि मी लगेच नाही म्हणाले, शर्मीनने हसत हसत तो किस्सा तिच्या या मुलाखतीत सांगतला. अभिनेत्री पुढे म्हणाली की, ती अजूनही सलमान खानच्या 'प्यार किया ते डरना क्या' मधील 'ओ ओ जाने जाना'ची फॅनगर्ल आहे. तिने सांगितले की त्या वयात तिला लग्नाचा अर्थ स्पष्टपणे समजला नव्हता आणि मी प्रत्येत गोष्टीला नाही म्हणायचे.   

शर्मीन सहगलने हिरामंडी सिनेमात आलमजेबची भूमिका साकारली आहे. तिची ही भूमिका प्रचंड गाजतेय. संजय लीला भन्साळींची पुतणी असूनही तिला कोणतीच विशेष ट्रीट मिळाली नाही. असंही तिने सांगितलं. इतर स्टार्सप्रमाणेच मीही त्या सेटवर जाऊन शूट करत होते. २०१९ साली शर्मीनने मंगेश हडवळेच्या 'मालाल'मधून पदार्पण केलं होतं. यानंतर ती  'अतिथी भूतो भव' प्रतीक गांधीसोबत दिसली आणि यानंतर तिची हिरामंडी प्रदर्शित झाला आहे. तुम्ही हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहू शकता.