अभिनेता जय दुधाणेची होणार 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत एन्ट्री!

Jay Dudhane Entry in Marathi Serial : लोकप्रिय अभिनेता जय दुधाणेची 'या' मालिकेत होणार एन्ट्री...

दिक्षा पाटील | Updated: May 17, 2024, 06:36 PM IST
अभिनेता जय दुधाणेची होणार 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत एन्ट्री!  title=
(Photo Credit : Social Media)

Jay Dudhane Entry in Marathi Serial : 27 मे पासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या येड लागलं प्रेमाचं मालिकेविषयी कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये राया आणि मंजिरी म्हणजेच अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांना आपण भेटलोय. लवकरच मालिकेतलं आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजेच इन्सपेक्टर जय घोरपडे प्रेक्षकांसमोर येणार आहे. जय कामात हुशार असला तरी लाचखाऊ आहे. तो जिथे रहातो तिथे त्याचा दबदबा आहे. लोकांना मदत करणं हे त्याचं कर्तव्य आहे असं तो सांगतो पण एकही काम स्वार्थाशिवाय करत नाही. अडचणीच्या वेळी मदत केल्याचं तो भासवतो पण अडकवणाराही बऱ्याचदा तोच असतो. रिअ‍ॅलिटी शोज गाजवलेला लोकप्रिय अभिनेता जय दुधाणे इन्सपेक्टर जय घोरपडेची भूमिका साकारणार आहे.

अभिनेता जय दुधाणे या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पोलिसाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या अनुभवाविषयी सांगताना तो म्हणाला, 'मी पहिल्यांदा पोलिस इन्सपेक्टरची भूमिका साकारतोय. माझे काका पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन मिळत आहे. आव्हान खूप मोठं आहे. व्यायाम माझं पॅशन आहे. या भूमिकेसाठी शरीरयष्ठीवर जास्त मेहतन घेतोय. विशालसोबत याआधी काम केल्यामुळे आमची ओळख होतीच. पूजासोबत पण छान मैत्री जमली आहे. आम्हा तिघांचे सीन्स खूप छान होत आहेत. विशाल आणि पूजा सहकलाकार म्हणून उत्तम आहेत. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी अर्थातच स्टार प्रवाहसोबतची पहिलीच मालिका असल्यामुळे मी जरा जास्त उत्सुक आहे. मालिकेमुळे घराघरात पोहोचता येतं. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती मिळावी हीच अपेक्षा आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

स्टार प्रवाह म्हणजे महाराष्ट्राची पहिली पसंती. स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांना भावतील आणि दैनंदिन आयुष्याचा भाग वाटतील अश्या मालिकेच्या कथा आणि घरातील सदस्य वाटावीत अशी पात्र उभी करुन रसिकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. मनोरंजनाचा हा प्रवाह असाच अखंडित ठेऊन नव्या मालिकांची पर्वणी स्टार प्रवाह वाहिनी घेऊन येत आहे. घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं नंतर स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका येड लागलं प्रेमाचं. माणसाला अंतर्बाह्य बदलून टाकतं ते प्रेम. प्रेमात समोरच्याला बदलण्याचा अट्टहास नसतो, जे जसं आहे ते अगदी तसं त्याच्या पूर्ण गुण-दोषांसकट स्वीकारणं म्हणजे प्रेम. येड लागलं प्रेमाचं ही मालिकाही प्रेमातल्या वेडपणाची साक्ष देणारी असेल.

हेही वाचा : शाहरुख खान-करण जौहर लंडनला जाऊन ठेवायचे 'समलैंगिक संबंध'! गायिका स्पष्टच बोलली

स्टार प्रवाहच्या या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘येड लागलं प्रेमाचं ही मालिका प्रेमामुळे बदलत जाणारी माणसं आणि मानसिक स्थिती यावर भर देत हळुवार भावना उलगडत पुढे जाणारी आहे. प्रेक्षकांना मालिकेत भव्यदिव्य सीक्वेन्स बघायला मिळतील आणि करमणूक प्रधान कथा पुढे सरकत जाईल.’तेव्हा पाहायला विसरू नका नवी मालिका येड लागलं प्रेमाचं 27 मे पासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाहवर.