एकाचवेळी दोघांसोबत काकीचे अनैतिक संबंध, पुतण्याला कुणकुण लागताच तिने रचला भयंकर कट

Crime News In Marathi: काकीचे एकाच वेळी दोन मुलांसोबत अनैतिक संबंध, एकाचा कुणकुण लागताच त्याने धमकी दिली. मात्र, त्यानंतर घडले भयंकर  

मानसी क्षीरसागर | Updated: May 19, 2024, 12:14 PM IST
एकाचवेळी दोघांसोबत काकीचे अनैतिक संबंध, पुतण्याला कुणकुण लागताच तिने रचला भयंकर कट title=
Aunty illegal relationship with nephew and minor boy murder mystery solved

Crime News In Marathi: राजस्थानच्या बाडमेर येथे गच्चीवर झोपलेल्या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचे प्रकरण घडले होते. या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. युवकाची हत्या त्याच्याच काकीने केल्याचे आता समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे. 

एका अल्पवयीन मुलासोबत काकीचे अनैतिक संबंध होते. त्याचबरोबर, मयत युवकाचेही काकीसोबत अनैतिक संबंध होते. युवकाने काकीवर जबरदस्तीने संबंध बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काकीने यासाठी नकार दिला. त्यानंतर युवकाने अश्लील फोटो शेअर करण्याची धमकी दिली. त्यानंतर काकी घाबरली आणि तिने त्याला मारण्याचा कट रचला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाडमेरच्या रामसर ठाणे परिसरात 18 वर्षांच्या जोगाराम नावाच्या युवकाचा मृतदेह सापडला होता. गच्चीवर झोपलेला असतानाच त्याच्यावर वार करण्यात आले. जोगाराम हा पुण्यात कामाला होता. 12 दिवसांपूर्वीच तो त्याच्या गावी बसरा येथे आला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जोगारामचे त्याच्या काकीसोबत अनैतिक संबंध होते. जेव्हा तो पुण्याहून गावी परतला तेव्हा त्याला कळलं की काकीचे दुसऱ्या मुलासोबतही संबंध आहेत. जोगारामने काकीला याचा जाब विचारला. तेव्हा तिने सुरुवातील नकार दिला. तेव्हा त्याने महिलेचे त्या व्यक्तीसोबत अश्लील फोटो असल्याचे सांगून तिला धमकावले. फोटो शेअर करण्याच्या धमकीने महिला घाबरली आणि तिने प्रियकरासोबत युवकाची हत्या करण्याचा कट रचला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजूने तिच्या प्रियकराला सोबत घेऊन गच्चीवर पोहोचली. तिथे जोगाराम झोपलेला होता. झोपेतच त्याच्यावर चाकूने व कुऱ्हाडीने वार केले. सकाळ होऊनही खूप वेळ लोटला तरी तो अजून खाली आला नाही हे पाहून त्याची पाच वर्षांची भाची वर गेली. तिथे त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाहून तिला धक्काच बसला तिने आरडा ओरडा बघून सगळ्यांना बाहेर बोलवले. जवळच्या रहिवाशांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. 

पोलिसांनी लगेचच घटनास्थळी पोहोचून चौकशी करण्यास सुरुवात केली. चौकशी करताना पोलिसांचा युवकाच्या काकीवर संशय गेला. चौकशीनंतर काकीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे उघड झाले. पोलिसांनी मयत व्यक्तीची काकी मंजू हिला अटक केली आहे. तर, तिच्या प्रियकरालाही ताब्यात घेतलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.