पृथ्वी व्यतीरीक्त आणखी 17 ठिकाणी सापडले पाण्याचे स्त्रोत; NASA चे सर्वात मोठे संशोधन

पृथ्वीव्यतीरीक्त आणखी कुठे जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? याचा जगभरातील संशोधक सोध घेत आहेत. या संशोधनात संशोधकांना मोठे यश आले आहे. पृथ्वी बाहेरील 17 ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आढळले आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Dec 18, 2023, 10:59 PM IST
पृथ्वी व्यतीरीक्त आणखी 17 ठिकाणी सापडले पाण्याचे स्त्रोत; NASA चे सर्वात मोठे संशोधन title=

NASA search exoplanet: पृथ्वीव्यतीरीक्त मानवाला राहण्यासाठी पर्यायी जागा शोधण्यासाठी संशोधक अथक परित्रण घेत आहेत. संशोधकांच्या या प्रयत्नाला लवकरच यश येणार आहे. अंतराळाचत पृथ्वी व्यतीरीक्त आणखी 17 ठिकाणी पाण्याचे स्त्रोत सापडले आहेत.  अमेरिकन अंतराळ संस्था नासाने यासंदर्भातील सखल डेटा गोळा केला आहे. हा डेटा मानवासाठी इतर ठिकाणी जीवसृष्टी निर्माण करण्याकरिता अत्यंत उपयुक्त ठरु शकतो. 

पृथ्वीबाहेरील 17 ग्रहांवर जीवसृष्टी असल्याचा दावा

आपल्या सूर्यमालातील फक्त पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे. आपल्या सूर्यमालेप्रमाणे असंख्य सूर्यमाला अंतराळात आहेत. अशा प्रकारच्या सूर्यमालेतील अनेक ग्रहांवर जीवसृष्टी असू शकते असा संशोधकांचा दावा आहे. पृथ्वीसारखे आणखी 17 ग्रह आहेत, जिथे जीवसृष्टी अस्तित्वात असू शकते असा दावा नासाने केला आहे. या ग्रहावंर पाणी साठा देखील आहे. हे सर्व 17 ग्रह आपल्या सूर्यमालेबाहेरील आहेत. काही ग्रहांवर बर्फाळ महासागर आहेत. काहींच्या पृष्ठभागावर महासागर आहेत. तर, काहींच्या पृष्ठभागाखाली महासागर आहेत असा दावा देखील नासाने आपल्या संशोधनाच्या माध्यमातून केला आहे.

नासाच्या शास्त्रज्ञांनी या 17 ग्रहांवर असलेल्या गिझरचा सखोल अभ्यास केला आहे. जमिनीवर अशी छिद्रे असतात जिथून कारंज्यासारखे पाणी बाहेर पडते. या छिद्रांना गीझर वैज्ञानिक भाषेत गिझर असे म्हणतात. पाणी गोठल्यामुळे किंवा वितळल्यामुळे बर्फाळ महासागराच्या पृष्ठभागाखाली दाब निर्माण होतो. अशा स्थितित जमीनीतील पाणी कारंजे सारखे बाहेर वाहायला लागते. कधीकधी हे कारंजे शंभर मीटर उंच असतात.

संशोधकांकडून एक्सोप्लॅनेट्सवर राहण्यायोग्य जागेचा शोध

सौरमालेच्या बाहेरील ग्रहांवर म्हणजे एक्सोप्लॅनेट्सवर मानवाला राहता येईल असा प्रकारच्या जागांचा जगभरातील शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. मानवाला  राहण्यायोग्य  असेलेले हे ह्युमन झोन पाण्याखाली किंवा जमिनीच्या पृष्ठभागावर असू शकतो. मात्र, या ग्रहावर जीवसृष्टी निर्माण करण्याआधी सर्वात महत्वाचा शोध आहे तो पाण्याचा. या 17 ग्रहांवर संशोधकांना पाणी सापडले आहे. हा पाण्याचा स्त्रोत महासागराच्या रूपात असल्याचे नासाच्या संशोधकांचे म्हणणे आहे. हे 17 ग्रह अगदी पृथ्वीसारखेच आहेत. विशेष म्हणजे हे 17 ग्रह पृथ्वीच्या जवळपास आहेत. येथे पुरेसा प्रकाश, पाणी आणि बर्फ आहे. दगड देखील आहेत. या खडकांची खरी रचना कशी आहे यावर देखील संशोधन सुरु आहे.