Maharashtra Lok Sabha Nivadnuk Voting LIVE:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी पुण्यात जाहीर सभा

Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: राज्यात आणि देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यामध्ये अनेक तुल्यबळ लढती पाहायला मिळतील.   

Maharashtra Lok Sabha Nivadnuk Voting LIVE:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी पुण्यात जाहीर सभा

Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11, तर देशातील 12 राज्यातील 94 मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होतेय. महाराष्ट्रातील ज्या 11 मतदारसंघात मतदान होणाराय, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गचा समावेश आहे. याठिकाणी पवार, नारायण राणे, उदयनराजे भोसले, छत्रपती शाहू महाराज, राजू शेट्टी अशा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

7 May 2024, 17:31 वाजता

राज्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.40 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती मतदान याचा आढावा

लातूर - 55.38

सांगली - 52.56

बारामती - 45.68

हातकणंगले - 62.18

कोल्हापूर - 63.71

माढा - 50

धाराशिव - 52.78

रायगड - 50.31

रत्नागिरी-सिंधुदूर्ग - 53.75

सातारा - 54.11

सोलापूर - 49.17

7 May 2024, 16:10 वाजता

लातूर लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 44.48 टक्के 

अहमदपूर...45.22 टक्के 
लातूर शहर..43.45 टक्के 
लातूर ग्रामीण..46.10 टक्के 
लोहा.......      42.10 टक्के 
निलंगा.....      44.50 टक्के 
उदगीर........   45.45 टक्के

7 May 2024, 15:47 वाजता

बोगस मतदानावरून वाद तापला; पद्माराजे केंद्रावर शिवसेनेने मतदान रोखले

 

7 May 2024, 15:36 वाजता

रायगड लोकसभा मतदार संघ; दुपारी 3 वाजेपर्यंत 41.43 टक्के मतदान

7 May 2024, 15:33 वाजता

- सातारा लोकसभा मतदारसंघ दुपारी 3 पर्यंत 43.08 % मतदान

- सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण 40.18% मतदान

- सांगली -  लोकसभा मतदारसंघासाठी  दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे 41.30 टक्के इतकया मतदानाची नोंद.

7 May 2024, 15:33 वाजता

सोलापूर मतदारसंघातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

 मोहोळ तालुक्यातील मनगोळी आणि भैरववाडी ग्रामस्थांनी गावाला येण्यासाठी रस्ते नसल्यामुळे ग्रामस्थांनी टाकला बहिष्कार मतदानावर बहिष्कार

7 May 2024, 14:58 वाजता

सोलापुरात सातपुते - काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची 

सोलापूरमध्ये भाजप उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोलापुरातील सिद्धेश्वर पेठ भागामध्ये मतदान केंद्रावर राम सातपुते यांनी मतदान केंद्राला भेट दिली होती. त्यावेळी काही लोक बोगस मतदान करण्याच्या प्रयत्नात असल्याचा संशय असल्याने सातपुते यांनी काही लोकांना बाहेर काढण्याची विनंती पोलिसांना केली. यातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाद घातल्याचा सातपुते यांनी आरोप केला. तर भाजप उमेदवार राम सातपुते मतदान केंद्रासमोर येऊन मतदारांना प्रभावित करत होते, असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय. तसंच सातपुते अरेरावेची भाषा केल्याने वाद झाल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा दावा आहे. 

 

7 May 2024, 14:38 वाजता

राजेंद्र पवार आणि श्रीनिवास पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी मतदान केलं. बारामतीतल्या पिंपळी इथल्या मतदान केंद्रावर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.  दरम्यान श्रीनिवास पवार यांनी बारामतीत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत त्यांनी अजित पवारांना जोरदार टोला लगावला...पैसे वाटप प्रकरणावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. शरद पवारांनी साठ वर्षात असं कधी केलं नाही असं श्रीनिवास पवारांनी म्हटलंय

7 May 2024, 14:35 वाजता

नात्यात विभक्तपणा येऊ नये हेच आमचं मत - शिरसाट

सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी का जाऊ नये... नात्यात विभक्तपणा येऊ नये हेच आमचं मत आहे.. सुप्रिया सुळेंनी आशाताईंच्या घेतलेल्या भेटीवर शिवसेनेने ही पहिली प्रतिक्रिया दिलीय.. आज हे गेले तर उद्या ते जातील असं विधान शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलंय...

 

7 May 2024, 14:34 वाजता

माढा लोकसभा मतदारसंघात रक्तरंजित राडा 

माढा लोकसभा मतदारसंघात रक्तरंजित राडा पाहायला मिळालाय... सांगोला तालुक्यातल्या महूदमध्ये दोन गटात जोरदार राडा झाला. कार्यकर्त्याचं डोकं फोडण्यात आलं...  विरोधी गटाकडून मारहाण झाल्याचा आरोप शेकाप कार्यकर्त्यांनी केलाय....