न घाबरता बाहेर पडा, कोरोनाबाबत अधिक शिक्षित व्हा - राजेश टोपे

'कोरोनाचे संकट जरी असले तरी कोणीही घाबरुन जाऊ नये. नेहमी घबरदारी घेतली पाहिजे. आता आपल्याला कोरोनासोबत जवीनशैलीत बदल करायला हवा.'

Updated: Jun 27, 2020, 03:05 PM IST
न घाबरता बाहेर पडा, कोरोनाबाबत अधिक शिक्षित व्हा - राजेश टोपे title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोनाचे संकट जरी असले तरी कोणीही घाबरुन जाऊ नये. नेहमी घबरदारी घेतली पाहिजे. आता आपल्याला कोरोनासोबत जवीनशैलीत बदल करायला हवा. कोरोनाला घाबरुन नका तर कोरोनाला समजून घ्या. कोरोनाबाबत अधिक शिक्षित झाले पाहिजे, असे सांगत कोरोना मृत्यूदर रोखणे मुख्य लक्ष्य आहे, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. टोपे हे  'झी २४ तास'च्या ' ई-संवाद - महाराष्ट्र एक पाऊल पुढे'  याखास कार्यक्रमात बोलत होते. 

घाबरु नका, मात्र, जागरुक राहिले पाहिजे (Lets Fight Corona) असे सांगत घराबाहेर पडताना त्रिसूत्र वापरण्याची गरज आहे. त्रिसूत्र म्हणजे एसएमएस. ही SMS प्रणाली वापरणे गरजेचे आहे. स्व-अंतर  (Self distance), मास्क (Mask), सॅनिटायझर (Sanitizer) याची गरज यापुढे निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनाला घाबरु नका, समजून घ्या. कोरोनाबाबत अधिक शिक्षित व्हा. जीवनशैली बदलायला हवी. कोरोनासोबत जगायला शिकायला हवे, असे सांगत राजेश टोपे यांनी कोरोनानंतर महाराष्ट्र कसा असेल, यावर बोलताना त्यांनी आपली भूमिक स्पष्ट केली.

कोरोनाला रोखण्यात यश येईलच. मात्र, त्यानंतर आपल्याला जीवन शैली बदलायला हवी. कोरोनासोबत जगायला शिकायला हवे. त्याचवेळी कोरोनाचा मुकाबला करताना कोरोना मृत्यूदर रोखणे हे मुख्य लक्ष आहे. राज्यातील जनतेला विमा कवच दिले. कोणीही घाबरुन जावू नये. कोरोना संदर्भात जरी एखादे लक्षण दिसले तरी काळजी घेत प्रथम डॉक्टरांकडे गेले पाहिजे. वृध्दापासून ते लहान मुले कोरोनातून बरे होत आहेत. तुम्ही घाबरून जावू नका. कोणती लक्षणे दिसले तर तात्काळ डॉक्टरांकडे जा. काहीही लपवू नको. ऑक्सिजनची पातळी शेवटच्या क्षणी कमी झाली तर धोका असतो. त्यामुळे तात्काळ उपचार होण्यासाठी डॉक्टरांकडे जायला हवे, असा सल्ला आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी दिला.

कोरोनापासून न घाबरता बाहेर पडा. येत्या दीड महिन्यात कोरोनावर नियंत्रण मिळण्यात यश, येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 'या एकजुटीने  कोरोनाला हरवायचे आहे. त्यासाठी सावध राहा आणि ही बाब समजून घ्या.  जनजागृती करण्यावर भर द्यावा. लहान बाळापासून ते वयोवृद्ध आजीपर्यंत अनेकजण  कोरोना आजारातून बरे झाले आहेत. त्यांच्या अनुभवातून आपल्याला शिकले पाहिजे. राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अॅण्‍टीबॉडीज चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती या चाचणीद्वारे मिळणार आहे. नागरिक हा केंद्रबिंदू मानून माणुसकी आणि मानवतेच्‍या दृष्टिने सर्वांनी एकत्र येऊन कोरोना विषाणूवर मात करण्याचे आवाहनही टोपे यांनी केले.