अशोक चव्हाणांच्या कारखान्याला सरकारकडून 147 कोटी; एकूण 11 नेते 'लाभार्थी'

Maharashtra : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केला आणि त्यांना लॉटरीच लागलीय. आधी भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आता त्यांच्या सहकारी कारखान्याला शेकडो कोटींची मदत करण्यात आलीय. 

राजीव कासले | Updated: Feb 29, 2024, 03:23 PM IST
अशोक चव्हाणांच्या कारखान्याला सरकारकडून 147 कोटी; एकूण 11 नेते 'लाभार्थी' title=

Maharashtra : सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यावर राज्य सरकार मेहरबान आहे. नुकतेच भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांच्या (Ashok Chavan) सहकारी कारखान्याला (Cooperative factory) राज्य सहकारी बँकेकडून (State Cooperative Bank) थकहमी पोटी 147.79 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आलीय. याच सोबत अजित पवार (Ajit Pawar) यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे, अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटे यांना देखील राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत दिलीय...तसंच एनसीडीसी मार्फत भाजप नेत्यांच्या कारखान्यांना मदत देण्यात आलीय. यात रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक यांच्या कारखान्यांना आर्थिक मदत जाहीर केलीय.

सध्या काँग्रेस मध्ये असलेले आणि भाजपला सातत्यानं मदत होईल अशी भुमिका घेणारे धनाजीराव साठे यांच्या संत कुर्मदास सहकरी कारखान्याला 59.49 कोटी रुपयांची मदत देण्यात आलीय. याआधी राष्ट्रिय सहकारी विकास निगमचा माध्यमातुन भाजप नेत्यांच्या कारखान्यांना जीवदान दिल्यानंतर आता अजित पवार यांनी देखील त्यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांच्या कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मदत मिळवून देत जीवदान देण्यात आलंय.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मदत केलेले कारखाने
1) भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना लक्ष्मी नगर नांदेड - 147.79 कोटी 
व्यवस्थापन- अशोक चव्हाण

2) संत कुरुमदास सहकारी कारखाना पडसाळी सोलापूर - 59.49 कोटी
व्यवस्थापन - धनाजीराव साठे

3) सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखाना भाळवणी पंढरपूर- 146.32 कोटी रुपये
व्यवस्थापन - कल्याणराव काळे

4) छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर इंदापूर- 128 कोटी रुपये
व्यवस्थापन- प्रशांत काटे

5) जय भवानी सहकारी साखर कारखाना शिवाजीनगर, गेवराई, बीड- 150 कोटी रुपये
व्यवस्थापन - अमरसिंह पंडित

एनसीडीसी मार्फत जीवदान मिळालेले भाजप नेत्यांचे कारखाने
1) शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर माळशिरस- 113.42 कोटी
व्यवस्थापन - विजयसिंह मोहिते पाटील

2) कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखाना महात्मा फुले नगर इंदापूर- 150 कोटी रुपये
व्यवस्थापन - हर्षवर्धन पाटील

3) निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजी नगर, रेडा इंदापूर- 75 कोटी रुपये
व्यवस्थापन- हर्षवर्धन पाटील

5) शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी, लातूर- 50 कोटी रुपये 
व्यवस्थापन- अभिमन्यू पवार

5) रामेश्वर सहकारी साखर कारखाना रावसाहेब नगर, जालना- 34.74 कोटी रुपये
व्यवस्थापन- रावसाहेब दानवे

6) भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर, सोलापूर- 126.38 कोटी रूपये
व्यवस्थापन- धनंजय महाडिक

पीएम मोदी यांचा आरोप
दरम्यान, काँग्रेस सरकारच्या काळात विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर झालं.. मात्र मधल्या मध्ये लूट झाली, असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी यवतमाळच्या सभेत केला. त्यावेळी कृषिमंत्री महाराष्ट्रातलेच होते, याची आठवण त्यांनी करून दिली. यावरून राऊतांनी मोदींना टोला लगावलाय. मोदी खोटं बोलत असून, शरद पवार हे उत्तम कृषीमंत्री होते असं मोदीच म्हणाले होते. याची आठवण राऊतांनी करून दिली.