BMC ला मिळाले नवे आयुक्त; नवी मुंबईसह ठाणे महापालिका आयुक्तांच्या नावांचीही घोषणा

भूषण गगराणी मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त बनले आहेत. सौरभ राव ठाण्याचे तर कैलास शिंदे नवी मुंबईचे महापालिका आयुक्त आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वनिता कांबळे | Updated: Mar 20, 2024, 04:57 PM IST
BMC ला मिळाले नवे आयुक्त; नवी मुंबईसह ठाणे महापालिका आयुक्तांच्या नावांचीही घोषणा  title=

Bhushan Gagrani : अखेर इक्बालसिंह चहल यांची उचलबांगडी झाली असून मुंबई महानगरपालिकेला नवे आयुक्त मिळाले आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी (Bhushan Gagrani ) यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. तर सौरव राव यांची ठाणे महापालिका आयुक्तपदी नेमणूक करण्यात आलीये. नवी मुंबई महापालिकेची जबाबदारी कैलास शिंदे यांना देण्यात आलीये. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर हे बदल करण्यात आले. 

मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी राज्य सरकारनं भूषण गगराणी, अनिल डिग्गीकर आणि संजय मुखर्जी अशा तीन नावांची शिफारस निवडणूक आयोगाला केली होती. या तिघांपैकी कोणाची मुंबई पालिका आयुक्त म्हणून वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर भूषण गगराणी यांची  मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. 

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आलीय. तर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाची जबाबदारी कैलास शिंदे यांच्यावर सोपवण्यात आलीय. ठाणे महापालिका आयुक्तपदाची धुरा सौरभ राव यांच्यावर असेल.  केंद्रीय निवडणूक आयोगानं तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या आयुक्तांना पदावरून हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि पी. वेलारसू यांची बदली करण्यात आली. आता इक्बालसिंह चहल यांच्याजागेवर भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आलीय. भूषण गगराणी याआधी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव होते.