माजी मुख्यमंत्र्यांच्या भाच्याशी लग्न करणाऱ्या अभिनेत्रीनं सोसल्या नरकयातना; कोण होती ती सौंदर्या?

Entertainment News : कलाजगत गाजवणारी आणि खुद्द रजनीकांत यांच्याही आवडीची ही अभिनेत्री अचानक दिसेनाशी झाली... तिचं नाव माहितीये... 

सायली पाटील | Updated: May 9, 2024, 01:45 PM IST
माजी मुख्यमंत्र्यांच्या भाच्याशी लग्न करणाऱ्या अभिनेत्रीनं सोसल्या नरकयातना; कोण होती ती सौंदर्या?  title=
(प्रतिकात्मक छाया) South actress jayalakshmi career life tragedy and unknown facts

Entertainment News : भारतीय कलाजगतामध्ये आजवर अनेक कलाकार मंडळींनी आपल्या कलेच्या बळावर लोकप्रियता मिळवली. काही कलाकारांच्या वाट्याला ही लोकप्रियता अगदी सहज आली. तर, काही कलाकारांना मात्र त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली. काहीही शाश्वत नसतं ही ओळख कलाविश्वासाठी अतिशय समर्पक आहे आणि सेलिब्रिटी मंडळींच्या जीवनातील काही पड्यमागच्या गोष्टी समोर येतात तेव्हाच याबाबतची प्रचिती येते. 

अशाच कलाकारांमध्ये एका अशा अभिनेत्रीचंही नाव घेतलं जातं जिनं प्रसिद्धी पाहिली, जी कमालीची लोकप्रिय झाली पण, तिनं अचानकच चित्रपट वर्तुळातून काढता पायही घेतला. या अभिनेत्रीनं दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये विशेष छाप सोडली. तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये एक गाळ गाजवणारी ही अभिनेत्री आहे जयलक्ष्मी. 

मल्याळम कलाजगतामध्ये जयलक्ष्मी यांची ओळख सुप्रिया, या नावानं होती. त्यांनी अभिनय कारकिर्दीत 10 वर्षांच्या आतच तामिळ, तेलुहू, मल्याळम आणि कन्नड अशा भाषांमध्ये जवळपास 66 चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती. रजनीकांत यांच्यासोबत अनेकदा झळकलेल्या जयलक्ष्मी यांनी त्या काळातील बऱ्याच लोकप्रिय अभिनेत्यांसमवेत स्क्रीन शेअर केली होती. 

काळ पुढे येत गेला आणि जयलक्ष्मी यांनी कलाविश्वामध्ये दमदार चित्रपट मिळवल आपल्या कारकिर्दीत यशाचे नवे ट्प्पे ओलांडण्यास सुरुवात केली. करिअरच्या प्रत्येक वळणावर जयलक्ष्मी हे नाव प्रसिद्ध होत गेलं, पण व्यक्तिगत जीवनात मात्र आव्हानांनी या अभिनेत्रीची पाठ सोडली नाही. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि एकेकाळचे अभिनेता एमजी रामचंद्रन यांच्या भाच्याशी त्यांचा विवाह झाला होता. पण, या नात्यात त्यांना अनेक संघर्षांचा सामना करावा लागला होता. 

South actress jayalakshmi career life tragedy and unknown facts

हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 : 'हे बरोबर नाही' शरद पवारांविषयी वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवार स्पष्टच म्हणाले

लग्नाच्या नात्यात जयलक्ष्मी आनंदी नव्हत्या. इतक्या की, 1980 मध्ये 22 व्या वर्षी त्यांनी या कारणानं स्वत:ला संपवण्यापर्यंतचं टोकाचं पाऊल उचललं. जयलक्ष्मी यांच्या आकस्मिक निधनामुळं संपूर्ण कलाजगताला हादरा बसला आणि तिथंच एक काळही संपला.