पनवेल हादरलं! अश्लील व्हिडीओ पाहून भावाचा बहिणीवर अत्याचार; 3 महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर..

Panvel Crime News: या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीचा गर्भपात करण्यासाठी तिचे आई-वडील तिला रुग्णालयात घेऊन आले असता हा प्रकार उघडकीस आला.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 20, 2024, 09:39 AM IST
पनवेल हादरलं! अश्लील व्हिडीओ पाहून भावाचा बहिणीवर अत्याचार; 3 महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर.. title=
या प्रकरणामध्ये पोलिसांनी दाखल केला गुन्हा (प्रातिनिधिक फोटो)

Panvel Crime News: नवी मुंबईमधील पनवेलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्याच बहिणीबरोबर शरीरसंबंध ठेवल्याचं उघडकीस आलं असून यामुळे 15 वर्षीय मुलगी गरोदर राहिली आहे. या प्रकरणामध्ये वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या मुलीचा गर्भपात करण्यासाठी तिचे पालक तिला घेऊन रुग्णालयात आल्याची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर सदर प्रकरण समोर आलं आहे.

गर्भपातासाठी आले असता समोर आली माहिती

पोलिसांना मेडिको-लिगल केसअंतर्गत अल्पवयीन मुलगी गर्भपातासाठी आल्याची माहिती वाशी जनरल हॉस्पीटलमधून देण्यात आली. या मुलीचे पालक तिचा गर्भपात करण्यासाठी तिला रुग्णालयात घेऊन आले होते. त्याचवेळी नियमानुसार मुलगी अल्पवयीन असल्याने रुग्णालयातून पोलिसांना माहिती कळवण्यात आल्यानंतर पोलीस रुग्णालयामध्ये आले आणि त्यांनी या कुटुंबाची चौकशी केली. या चौकशीदरम्यान ही मुलगी 3 महिन्यांची गरोदर असल्याचं म्हटलं आहे.

एकत्र अश्लील व्हिडीओ पाहिला

पोलिसांनी या प्रकरणामध्ये बलात्काराचा तसेच पॉस्को (POCSO) म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला. त्यामध्ये तिने भावाबरोबर एकत्र पॉर्न व्हिडीओ पाहिल्याची कबुली दिली. डिसेंबर 2023 मध्ये दोघांनी या पॉर्न व्हिडीओत जे पाहिलं ते प्रत्यक्षात करुन पाहण्याचा निर्णय घेतल्याचंही या मुलीने सांगितलं. मात्र या दोघांनी शरीरसंबंध ठेवले नाहीत असा दावा केला. 

मासिक पाळी न आल्याने आईला कळवलं

मात्र पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2024 मध्ये तिच्या भावाने तिच्यावर बलात्कार केला. माझी मासिक पाळी न आल्याने मी याबद्दल आईला कळवलं, अशी माहिती पीडितेने पोलिसांना दिली. त्यानंतर या मुलीचे पालक तिला रुग्णालयातही घेऊन गेले होते. 

आई-वडील घरी नसताना घडला हा प्रकार

हे कुटुंब अल्प उत्पन्न असलेल्या गटात मोडतं असून या दोघांचे आई-वडील रोजंदारीवर काम करतात. दोन्ही पालक कामानिमित्त घराबाहेर असताना भावा-बहिणीने शरीरसंबंध ठेवले. घरची परिस्थिती बेताची असल्याने या मुलांचे वडील एकापेक्षा अनेक ठिकाणी छोटी मोठी कामं करुन संसराचा गाडा हाकतात अशी माहिती समोर आली आहे.

आता मुलाला बाल विकास आयुक्तांसमोर सादर करणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाला बाल विकास आयुक्तांसमोर सादर केलं जाणार आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी खांडेश्वर पोलीस करत आहेत.