मेटानंतर आता Elon Musk यांनी घेतला Wikipedia शी पंगा; म्हणाले, 'मी एक अब्ज डॉलर्स देतो, तुम्ही फक्त...'

Elon Musk On Wikipedia : अब्जाधीश एलॉन मस्क यांनी आधीच मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरची ओळख बदलली आहे आणि आता विकिपीडियाला ऑफर दिली आहे. मस्क यांनी विकिपीडियाला विशेष अटींसह 1 अब्ज डॉलर देण्याचं आश्वसन दिलंय.

सौरभ तळेकर | Updated: Oct 24, 2023, 11:19 PM IST
मेटानंतर आता Elon Musk यांनी घेतला Wikipedia शी पंगा; म्हणाले, 'मी एक अब्ज डॉलर्स देतो, तुम्ही फक्त...' title=
Elon Musk Wikipedia

Elon Musk offer to Wikipedia : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरची मालकी एलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे आल्यानंतर आता ट्विटरची ओळख बदलली आहे. मस्क यांनी ट्विटरचं बारसं घालून त्याचं नाव एक्स (X) ठेवलं आहे. मस्क सोशल मीडियावर अॅक्टिव असल्याचं नेहमी पहायला मिळतं. काही दिवसांपूर्वी त्यांनी मार्क झुकरबर्ग यांच्या मेटाशी पंगा घेतला होता. त्यानंतर आता मक्स यांनी विकिपीडियाशी (Wikipedia) पंगा घेतला आहे. सध्या मस्कची एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी विकिपीडियाचे नाव बदलण्यासाठी 1 अब्ज डॉलर्स देणार असल्याचं म्हटलंय. 

नेमकं काय झालं?

विकिपीडियाचे संस्थापक जिमी वेल्स यांनी एक आव्हान केलं होतं. विकिपीडिया विक्रीसाठी नाही. कृपया हे वाचल्याशिवाय पुढे जाऊ नका. हे वाचण्यासाठी तुम्हाला फक्त एक मिनिट लागेल, अशा आशयाची पोस्ट करण्यात आली होती. विकिपीडियाच्या या आवाहनात वाचकांकडून देणग्या मागितल्या आहेत. या पोस्टचा स्क्रिनशॉट मस्क यांनी ट्विटरवर शेअर केला. विकिपीडिया चालवणाऱ्या विकिमीडिया फाउंडेशनला ही देणगी आणि एवढ्या पैशांची गरज का आहे, असा सवाल मस्क यांनी केला आहे.

विकिमीडिया फाऊंडेशनला फक्त विकिपीडिया चालवण्यासाठी एवढ्या पैशांची गरज नसावी, असं मस्क म्हणतात. त्यावेळी त्यांनी विकिपीडियाला खुल्ली ऑफर दिली आहे. जर विकिपीडियाने त्याचे नाव बदलून डिकिपीडिया केले तर मी 1 अब्ज डॉलर्स देणार, अशी घोषणा मस्क यांनी केली. त्यावेळी त्यांनी एक अट देखील ठेवली. एका वर्षासाठी त्यांना या प्लॅटफॉर्मचं नाव डिकिपीडिया ठेवावं, असंही मस्क म्हणाले. 

आणखी वाचा - रियालिटी शोमध्ये घुसून पोलिसांची कारवाई, प्रसिद्ध अभिनेत्याला 'या' कारणामुळं अटक!

दरम्यान, पोस्ट शेअर केल्यापासून ती 166 लाख वेळा पाहिली गेली आहे आणि 15 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. लोकांना विकिपीडिया सुविधा मोफत मिळत राहावी यासाठी ते देणग्या गोळा करते. विकिमीडिया फाउंडेशन अनेकदा यासाठी डोनेशन ड्राइव्ह चालवते. भारतात यासाठी लोकांकडून किमान 25 रुपये देणगी मागितली जाते.