तुमच्या नावावर किती SIM Card? अवघ्या 60 सेकंदात जाणून घ्या

SIM Card : तुमच्या नावावर किती सिम कार्ड सुरु आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? किंवा तुम्ही तुमच्या नावावर दुसरे सिम कार्ड वापरत आहात? यासारख्य अनेक प्रश्नाची उत्तरे तुम्हाला माहिती करुन घ्यायची असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल...  

श्वेता चव्हाण | Updated: Jan 6, 2024, 05:03 PM IST
तुमच्या नावावर किती SIM Card? अवघ्या 60 सेकंदात जाणून घ्या title=

How to Check Your SIM Card : तुम्ही नवीन सिम कार्ड खरेदी करताना आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्राची गरज लागते. तसेच नवीन सिमकार्ड खरेदी करताना तुमच्याकडे किती सिमकार्ड असतील? असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तुम्हालाही असे प्रश्न पडत असतील तर काळजी करण्याची गरज नाही. याचे कारण म्हणजे केवळ एका मिनिटात तुम्हाला त्याबद्दलची माहिती अगदी सोप्या पद्धतीने मिळू शकते.

सिम कार्ड म्हणजे सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल (SIM Card).मोबाईलमध्ये सिम कार्ड नसल्यास कॉल, मेसेज आणि इंटरनेट वापरू शकत नाही. सिम कार्डमध्ये आपले ठिकाण फोन नंबरवर्क नेटवर्क माहिती, वैयक्तिक माहिती इत्यादी अनेक गोष्टी समाविष्ट असतात. दरम्यान भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक नवीन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे, तुम्ही तुमच्या फोनवर किती सिमकार्ड नोंदणीकृत आहेत आणि तुमच्या फोनवर एकापेक्षा जास्त सिमकार्ड असल्यास आणि तुम्ही ते वापरत नसताना सिमकार्ड कसे बंद करावे, हे तुम्ही तपासू शकता...

भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक नवीन पोर्टल जारी केले आहे. किंवा पोर्टलद्वारे तुम्ही किती सिम कार्ड उपलब्ध आहेत हे तपासू शकता. यासाठी तुम्हाला https://Www.sancharsaathi.Gov.In/ या लिंकला भेट द्यावी लागेल. जर तुमच्या बनावट ओळखपत्राच्या आधारे कोणी तुमचे सिम कार्ड वापरत असेल तर तुम्ही पोर्टलद्वारे तो नंबर ब्लॉक करू शकता. एका ओळखपत्राच्या आधारे तुम्ही जास्तीत जास्त 9 सिम कार्ड वापरू शकता.

तुमच्याकडे किती सिमकार्ड आहेत?

सर्वप्रथम तुम्हाला https://Www.Sancharsaathi.Gov.In/ ही लिंक ओपन करावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि ओटीपी रिक्वेस्ट बटणावर क्लिक करावे लागेल.

OTP प्राप्त केल्यानंतर, तुम्हाला व्हॅलिडेट पर्यायावर क्लिक करावे लागेल.

तेथे तुम्हाला तुमच्या आयडी प्रूफ आणि सक्रिय मोबाइल नंबरची यादी दिसेल.

सिमकार्ड बंद करण्यासाठी

तुम्हाला जर सिमकार्ड बंद करायचे असेल तर बॉक्समध्ये तुमचे नाव टाका, त्यानंतर खाली रिपोर्ट या बटणावर क्लिक करा.

रिपोर्ट ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक संदर्भ क्रमांक दिसेल. त्यामुळे कुठेतरी संदर्भ क्रमांक लिहून ठेवा किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा किंवा फोटो काढा.

काही दिवसांनंतर, तुम्ही केलेल्या अहवालाचे तपशील पाहण्यासाठी, पोर्टल किंवा वेब पोर्टलवर लॉगिन करा. म्हणजे स्टेप्स 1प्रमाणे. मग तुम्हाला तुमचा अहवाल, तुम्हाला तुमचा रिपोर्ट ट्रॅक करण्यासाठी तुमचा Ticket ID Ref No. वरती असलेल्या बॉक्समध्ये टाका.

नंतर तुमच्यासमोर तुमच्या रिपोर्टचा स्टेटस उघडेल. तर अशाप्रकारे न वापरलेले सिमकार्ड, तुम्ही न घेतलेले  सिमकार्ड या पोर्टलच्या माध्यमातून बंद करु शकता. तुम्हाला तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहे हे सुद्धा कळू शकते.