Rohit Sharma On Jasprit Bumrah: पराभवानंतर रोहितला आली जस्सीची आठवण, म्हणाला "बुमराहशिवाय आमचं..."

RCB vs MI, IPL 2023 News: पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये रोहित शर्माने (Rohit Sharma) बुमराहचा उल्लेख करत महत्त्वाची गोष्ट बोलून दाखवली आहे. कोणीतरी पुढाकार घेऊन पुढं जाणं आवश्यक आहे. आम्ही त्यावर (Jasprit Bumrah) अवलंबून राहू शकत नाही, असं रोहित शर्मा म्हणतो.

Updated: Apr 3, 2023, 12:09 AM IST
Rohit Sharma On Jasprit Bumrah: पराभवानंतर रोहितला आली जस्सीची आठवण, म्हणाला "बुमराहशिवाय आमचं..." title=
IPL 2023,Rohit Sharma,Jasprit Bumrah

Rohit Sharma remembered Jasprit Bumrah: आयपीएलच्या पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेजर्स बंगळुरूने (RCB vs MI) मुंबई इंडियन्सचा 8 गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात आरसीबीचे ओपनर विराट कोहली (Virat Kohli) आणि फाफ ड्युप्लेसिस (Faf du Plessis) या दोघांनी मिळून मुंबईच्या गोलंदाजांचा घाम फोडला. त्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील वैतागल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता सामना संपल्यानंतर रोहित शर्माला आपला लाडका बॉलर जसप्रीत बुमराहची आठवण आल्याचं पहायला मिळतंय. (MI Captain Rohit Sharma remembered Jasprit Bumrah says someone needs to put their hand up and step up latest IPL 2023 News)

रोहितने केलं Tilak Verma चं कौतूक

तिलक आणि इतर काही फलंदाजांकडून खरोखर खेळ दाखवला. पण, आम्ही बॉलिंग करताना चांगली कामगिरी केली नाही. फलंदाजीसाठी ही चांगली खेळपट्टी होती. तिलक वर्मा ने उत्तम खेळ केला. तो एक सकारात्मक व्यक्ती आहे, खूप प्रतिभावानही आहे. त्याने खेळलेले काही फटके खूप धाडसाचे होते, असं म्हणत रोहितने तिलक वर्माचं (Rohit Sharma On Tilak Verma) तोंडभरून कौतूक केलंय.

Jasprit Bumrah वर काय म्हणाला?

गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून आम्हाला जसप्रीत बुमराहशिवाय खेळण्याची सवय आहे. अर्थात हा वेगळा सेटअप आहे पण कोणीतरी पुढाकार घेऊन पुढं जाणं आवश्यक आहे. आम्ही त्यावर अवलंबून राहू शकत नाही, असं रोहित शर्मा म्हणाला आहे. प्लेयर्सची दुखापती आपल्या नियंत्रणात नाहीत, त्यावर आम्ही फार काही करू शकत नाही. संघातील इतर खेळाडू देखील खूप प्रतिभावान आहेत. आपण त्यांना संधी द्यायला हवी, असं रोहित शर्मा (Rohit Sharma On Jasprit Bumrah) म्हणालाय.

आणखी वाचा - RCB vs MI: LIVE सामन्यात मोठी दुर्घटना, Dinesh Karthik-Siraj मध्ये जोरदार टक्कर; पाहा नेमकं काय झालं?

पहिल्या सहा षटकांत फलंदाजी करताना चांगली सुरुवात झाली नाही. फलंदाजीसाठी आजची खेळपट्टी चांगली होती. आम्ही कोणतंही लक्ष्य ठेवलं नाही परंतु आम्ही आमच्या क्षमतेच्या निम्म्यापर्यंत फलंदाजीही केली नाही आणि आम्ही 170 पर्यंत पोहोचलो. कदाचित 30-40 धावा जास्त केल्या असत्या, असा विश्वास रोहितने दाखवला आहे.