LSG vs CSK Live Score, IPL 2024 : एकाणा स्टेडियमवर लखनऊचाच डंका! चेन्नईचा 8 विकेट्सने पराभव

LSG vs CSK Live Score, IPL 2024 : आज लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर आयपीएल 2024 चा 34 वा सामना खेळला जाणार आहे. यात लखनऊ सुपर जाएंट्ससमोर तगड्या चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान असणार आहे.    

LSG vs CSK Live Score, IPL 2024 : एकाणा स्टेडियमवर लखनऊचाच डंका! चेन्नईचा 8 विकेट्सने पराभव

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Score in Marathi: लखनऊचे होमग्राउंड असलेल्या अटल बिहारी वाजपेयी एकाणा स्टेडियममध्ये लखनऊ सुपर जाएंट्सने आतापर्यंत एकूण 3 सामने खेळले आहेत, त्यातून लखनऊने 2 सामने आपल्या खिशात टाकले आहेत, तर एका सामन्यात पराभवाला सामोरे गेले आहेत. पॉइंटस टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्स ही 8 गुणांसोबत तिसऱ्या स्थानावर आहे, तर लखनऊ ही 6 गुणांसोबत पाचव्या स्थानावर आहे. तर आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार यावर सर्वांचे लक्ष असणार आहे? 

 

19 Apr 2024, 23:21 वाजता

लखनऊच्या होमग्राउंडवर चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. कॅप्टन राहूल आणि डि कॉकच्या उत्कृष्ट खेळीमुळे लखनऊने आजचा सामना 8 विकेट्सने जिंकला आहे. पॉइंट्स टेबलमध्ये लखनऊच्या या विजयाने एलएसजी ही 8 गुणांसोबत पाचव्या क्रमांकावरच आहे. 

19 Apr 2024, 22:41 वाजता

15 ओव्हरनंतर क्विंटन डि कॉकचे पण अर्धशतक पूर्ण झाले आहे. 41 बॉलमध्ये 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने आपले 50 रन पूर्ण केले आहेत. 15 ओव्हरच्या समाप्तीनंतर लखनऊचा स्कोर 134-1 असा आहे. डि कॉक हा 54 धावा करून मुस्ताफिजूरच्या 15 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर आउट झाला आहे.

19 Apr 2024, 22:18 वाजता

10 ओव्हरनंतर लखनऊ सुपर जाएंटस मजबूत स्थितीत दिसत आहे. राहूल हा 49 वर, तर डि कॉक हा 36 धावांवर खेळत आहे. राहूलने आपल्या या उत्कृष्ट खेळीत 4 चौके आणि 3 षटकार लगावले आहेत. 10 ओव्हरनंतर लखनऊचा स्कोर 89-0 असा आहे.

19 Apr 2024, 21:52 वाजता

5 ओव्हरनंतर लखनऊकडून डिकॉक-राहूलच्या जोडीने सांभाळून सुरूवात केली आहे. डि कॉक 18 वर तर राहूल 23 धावांवर खेळत आहे. पाचव्याओव्हरच्या समाप्तीनंतर लखनऊचा स्कोर 43-0 असा आहे.

19 Apr 2024, 21:16 वाजता

चेन्नई सुपर किंग्सने 20 ओव्हरमध्ये एकूण 176 धावा केल्या आहेत. यात सीएसकेकडून रहाणेने 36, जडेजाने 57, अलीने 30 तर एम एस धोनीने शेवटच्या दोन ओव्हरमध्ये फक्त 9 बॉलमध्ये 28 धावांची तूफानी खेळी खेळली आहे. लखनऊकडून गोलंदाजीत क्रुणाल पांड्याने 2, तर मोहसिन खान यश ठाकूर. रवी बिश्नोई आणि मार्कस स्टॉयनिस या चौघं गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या आहेत.

आता लखनऊच्या फलंदाजीच्या वेळेस बघण्यायोग्य गोष्ट असणार की, आपल्या होमग्राउंडवर लखनऊ सुपर जाएंट्स धोनीच्या सेनेला रोखू शकणार की नाही?

19 Apr 2024, 21:01 वाजता

18 व्या ओव्हरमध्ये रवी बिश्नोईने चेन्नईचा सेट फलंदाज मोईन अली याला 30 धावांवर बाद केलं आहे. सहाव्या विकेटनंतर मैदानात एम एस धोनी हा फलंदाजीसाठी आला आहे.

19 Apr 2024, 20:55 वाजता

17 व्या ओव्हरमध्ये चेन्नईचा धाकड ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने 35 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. जडेजाच्या या इनिंगमध्ये एकूण 5 चौके आणि 1 षटकार सामील आहे. 

19 Apr 2024, 20:42 वाजता

15 ओव्हरनंतर सीएसकेचा स्कोर 105-5 असा आहे. रविंद्र जडेजाने एक बाजू चांगल्या पद्धतीने सांभाळून ठेवली आहे. जडेजा हा 40 तर मोईन अली हा 7 धावांवर नाबाद आहे.

19 Apr 2024, 20:33 वाजता

13 व्या ओव्हरमध्ये क्रूणाल पांड्याने चेन्नईला आणखी एक धक्का दिला आहे. समीर रिजवी हा केवळ एक रन बनवुन आउट झाला आहे. पाचव्या विकेटनंतर मोईन अली हा फलंदाजीसाठी आला आहे.

19 Apr 2024, 20:26 वाजता

मार्कस स्टॉयनिसने आपल्या पहिल्या आणि इनिंगच्या 12 व्या ओव्हरमध्ये सीएसकेचा तूफानी फलंदाज शिवम दूबे याला फक्त 3 धावांवर बाद केलं आहे. चौथ्या विकेटनंतर अजिंक्य रहाणेच्या जागी इम्पॅक्ट खेळाडूम्हणून समीर रिजवी हा फलंदाजीसाठी आला आहे.