IPL 2024 Playoff : प्लेऑफमध्ये पावसाने खोडा घातला तर कसा ठरणार विजेता? जाणून घ्या नियम

IPL Playoffs rain rules : पावसामुळे आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील दोन सामने धुवून निघालेत. त्यामुळे आता प्लेऑफमध्ये जर पाऊस आला तर विजेता संघ कसा निवडणार? यासाठी आयपीएलचे नियम कसे असतील? पाहुया

सौरभ तळेकर | Updated: May 20, 2024, 12:17 AM IST
IPL 2024 Playoff : प्लेऑफमध्ये पावसाने खोडा घातला तर कसा ठरणार विजेता? जाणून घ्या नियम title=
IPL 2024 Playoff Rain Rules

IPL 2024 Playoff Rain Rules : आयपीएल 2024 साठीचे साखळी सामने आता संपले असून प्लेऑफचा (IPL 2024 Playoff) थरार सुरू झालाय. कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेजर्सं बंगळुरू या चार संघांनी प्लेऑफचं तिकीट निश्चित केलंय. क्वालिफायर-1 मध्ये केकेआर आणि हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात सामना खेळवला जाईल. तर इलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी (RR vs RCB) यांच्यात खेळवला जाईल. मात्र, जर पावसाने जर प्लेऑफमध्ये हजेरी लावली तर सामन्याचा निकाल कसा लागणार? असा सवाल विचारला जातोय. आयपीएलचे यासाठी काही नियम (IPL Rules For Playoffs) आहेत.

केकेआर आणि राजस्थान यांच्यातील सामना रद्द झाल्याने राजस्थानचे आता 17 पाँइंट्स झाले आहेत. तसेच सनरायझर्स हैदराबादचेही 17 पाँइंट्स आहे. मात्र, आता हैदराबादचा नेट रनरेट राजस्थानपेक्षा जास्त असल्याने हैदराबादने पाँइंट्स टेबलमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे. तर तिसऱ्या स्थानावर राजस्थान पोहोचली आहे. तसेच चौथ्या स्थानी आरसीबी आहे.

प्लेऑफचं शेड्यूल कसं असेल?

आयपीएल जसजशी शेवटच्या दिशेने वाटचाल करत आहे तसतसा सामन्यांमध्ये पावसाचा धोका वाढत आहे. 21 मे रोजी केकेआर आणि हैदराबाद यांच्या क्वालिफायर-1 सामना होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. तर 22 मे रोजी राजस्थान आणि आरसीबी यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एलिमिनेटर सामना होईल. तर क्वालिफायर-2 चा सामना 24 मे रोजी एमए चिदंबरम स्टेडियमवर होईल. तर फायनलचा सामना 26 मे रोजी चेन्नईच्याच एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. 

कसा ठरेल विजेता? राखीव दिवस नाही...

प्लेऑफच्या आणि फायनल सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आला नाही. या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर, प्लेऑफचे सामने किमान पाच ओव्हर खेळवता आले नाहीत, तर सामन्यांचा निकाल सुपर ओव्हरद्वारे लावला जाईल. सुपर ओव्हर टाकण्याची परिस्थिती नसेल, तर पॉइंट टेबलनुसार संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. म्हणजे ज्या संघाकडे पाईंट्स टेबलमध्ये सर्वाधिक गुण असतील तो संघ विजयी मानला जाईल.