Asia Cup 2023: एशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा, 'या' तारखेला पाकिस्तानशी भिडणार

Asia Cup 2023: श्रीलंकेत 14 ते 23 जूलैदरम्यान खेळवण्यात येणाऱ्या एशिया कप 2023 स्पर्धेसाठी 15 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.  20 वर्षाच्या खेळाडूची या संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

राजीव कासले | Updated: Jul 4, 2023, 08:39 PM IST
Asia Cup 2023: एशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा, 'या' तारखेला पाकिस्तानशी भिडणार title=

Emerging Asia Cup 2023: एशिया कप 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेला 31 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. 17 सप्टेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. एशियन क्रिकेट काऊंसिल (Asian Cricket Council) लवकरच या स्पर्धेचं अधिकृत शेड्यूल्ड जाहीर करेल. त्याआधी एसीसी मेन्स इमर्जिंग एशिया कप 2023 (Emerging Asia Cup 2023) स्पर्धा जुलैमध्ये खेळवण्यात येणार आहे. 13 ते 23 जुलैदरम्यान श्रीलंकेत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी भारतीय निवड समितीने टीम इंडियाची (Team India) घोषणा केली आहे. 

15 खेळाडूंच्या संघाची घोषणा
ज्युनिअर क्रिकेट कमिटीने श्रीलंकेतील कोलंबोत होणाऱ्या एसीसी मेन्स इमर्जिंग एशिया कप 2023 स्पर्धेसाठी 15 खेळाडूंच्या संघाची निवड केली आहे. या स्पर्धेत आशियातल्या आठ संघांचा समावेश असेल. 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. 

पाकिस्तानला भिडणार
8 संघांची दोन ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली असून प्रत्येक ग्रुपमध्ये चार संघांचा समावेश करण्यात आला आहे. भारत ए 'ग्रुप बी'मध्ये असून या ग्रुपमध्ये नेपाल ए, यूएई ए आणि पाकिस्तान ए संघांचा समावेश आहे. 'ग्रुप ए'मध्ये  श्रीलंका ए, बांगलादेश ए, अफगाणिस्तान ए आणि ओमान ए या चार संघांचा समावेश आहे. प्रत्येक ग्रुपमधून टॉपचे दोन संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. पहिला सेमीफायनल सामना ग्रुप ए मधला अव्वल संघ आणि ग्रुप बी मधल्या दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघांदरम्यान रंगेल. तर दुसरी सेमीफायनल ग्रुप बी मधला अव्वल संघ आणि ग्रुप एमधला दुसऱ्या क्रमांकाच्या संघांदरम्यान होईल. या स्पर्धेचा अंतिम 23 जुलैला खेळवला जाणार आहे. 

यश ढुल कर्णधार
भारताला अंडक-19 विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार यश ढुलकडे (Yash Dhull) टीम इंडियाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत यश ढुलने आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. विश्वचषक स्पर्धेच्या 4 सामन्यात यशने तब्बल 229 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट 76 हून जास्त होता. यश आतापर्यंत 15 फर्स्टक्लास सामने खेळलाअसून यातत्याने 1145 धावा केल्या आहेत. यात 4 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. 

इमर्जिंग एशिया कपसाठी भारतीय संघ
यश ढुल (कर्णधार), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा (उपकर्णधार), निकिन जोस, प्रदोष रंजन पॉल, रियान पराग, निशांत सिंधु, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर),  ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, युवराजसिंह डोडिया, हर्षित राणा, आकाश सिंह, नीतीश कुमार रेड्डी, राजवर्धन हंगरगेकर.

स्टँडबाय खेळाडू : हर्ष दुबे, नेहल वढेरा, स्नेल पटेल, मोहित रेडकर