पृथ्वीचं नेमकं वय काय? World Earth Day ला जाणून घ्या 10 इंटरेस्टिंग फॅक्ट्स

World Earth Day 2024 : दरवर्षी 22 एप्रिल रोजी पृथ्वी दिन साजरा केला जातो. झपाट्याने बदलणारी जीवनशैली आणि महत्त्वाकांक्षा यामुळे आपण निसर्गाची झपाट्याने हानी करत आहोत. त्याचे परिणाम ग्लोबल वार्मिंग, भूकंप, दुष्काळ आणि इतर प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींच्या रूपातही आपण भोगत आहोत. आपल्या काही सवयी बदलून आपण पृथ्वीला तिच्या मूळ स्वरूपात परत आणण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकू शकतो. अशावेळी जाणून घेऊया पृथ्वीचे 10 इंटरेस्टिंग फॅक्ट्स . 

| Apr 22, 2024, 07:50 AM IST

जगभरात 22 एप्रिल रोजी World Earth Day साजरा केला जातो. आजचा दिवस हा असा आहे जेव्हा प्रत्येकाने आपल्या या पृथ्वीची कृतज्ञता व्यक्त करायला हवी. कारण या ग्रहाबद्दल आणि आत्तापर्यंत लाभलेल्या अद्भुत नैसर्गिक संसाधनांबद्दल आभार मानायला हवेत. भविष्यातील पिढ्या त्या संसाधनांचा आनंद घेत राहतील याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो करायला हवेत, याची आठवण करुन देणारा हा दिवास. 

पृथ्वी दिन हा आपल्या ग्रहाची अधिक चांगली काळजी घेण्यासाठी आयुष्यभर स्मरण करण्याचा दिवस.  अशावेळी आपण हा दिवस साजरा करत असताना पृथ्वी या आपल्या ग्रहाबद्दल ठराविक माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. ज्या पृथ्वीवर आपण राहतो ती तिचं नेमकं वय काय?

1/10

पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण एकसमान नाही

World Earth Day 2024

जर पृथ्वी एक परिपूर्ण गोलाकार असते. तर तिच्याकडे एकसमान गुरुत्वाकर्षण क्षेत्र असते. पृथ्वी कधीही गोलाकार नसल्यामुळे आणि निसर्गात खडबडीतपणा असल्याने गुरुत्वाकर्षण बदलत जाते. 

2/10

पृथ्वी गोल नाही

World Earth Day 2024

सामान्यपणे मानवाला पृथ्वी गोल दिसते परंतु तुम्हाला वाचून धक्का बसेल पण पृथ्वी गोलाकार नाही. नॅशनल ओशियन आणि ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशननुसार, पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरत असताना तिचे गुरुत्वाकर्षण केंद्राकडे ढकलले जाते त्यामुळे ती फरशीच्या आकाराची दिसते. 

3/10

पार्थिव ग्रह

World Earth Day 2024

पृथ्वी खडक, धातू यांसारख्या विविध सिलिकेट पदार्थांनी बनवलेली आहे. त्यामुळे त्याला पार्थिव ग्रह म्हटले जाते. इतर स्थलीय ग्रहांमध्ये बुध, शुक्र आणि मंगळ यांचा समावेश आहे. 

4/10

पृथ्वी किती वर्षे जुनी

World Earth Day 2024

विश्वास बसणार नाही पण पृथ्वी तब्बल 4.54 अब्ज वर्षे जुनी आहे. आपल्या ग्रहाच्या खडकांवर संशोधन करुन असा दावा केला आहे की, पृथ्वी सुमारे 4.54 अब्ज वर्षे जुनी आहे. 

5/10

सूर्यमालेतील समर्थन प्रणाली

World Earth Day 2024

पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जो जीवसृष्टीला ऑक्सिन आणि पाण्याच्या उपस्थितीमुळे जगण्यासाठी आवश्यक आहे. ऑक्सिजनमध्ये मुबलक आणि भरपूर पाण्याने वेढलेले, प्राण्यांनाही राहण्यासाठी येथे योग्यमान तापमान आहे. 

6/10

ग्रहावरील सर्वात कोरडे ठिकाण

World Earth Day 2024

पृथ्वीवरील सर्वात कोरडे ठिकाणी प्रशांत महासागराच्या शेजारी आहे. म्हणजेच उत्तर चिलीमध्ये अटाकामा वाळवंट आहे. अटाकामाच्या कॅलामा शहरात 1972 साली झालेल्या वादळा अगोदर 400 वर्षात पाऊस पडला नाही. 

7/10

दिवस मोठे

World Earth Day 2024

पृथ्वीवर दिवस मोठे होत आहेत. 620 दशलक्ष वर्षांच्या कालावधीत दिवसाची लांबी 6 तासांवरुन 21.9 तासांपर्यंत वाढली आहे. सरासरी दिवस 24 तासांचा असतो परंतु प्रत्येक शतकात तो 1.7 मिलिसेकंदांनी वाढतो, असे संशोधनात आढळून आले आहेत.   

8/10

सूर्य अखेरील मरेल

World Earth Day 2024

जेव्हा सूर्यामधील हायड्रोजन वायूचा पुरवठा संपेल तेव्हा तो गुरुत्वाकर्षणाच्या खाली कोसळेल. या प्रक्रियेत पृथ्वीचे बाष्पीभवन होईल कारण सूर्याचा विस्तार होतो. त्यामुळे त्याचा आकार सध्यापेक्षा 2000 पट मोठा असेल. 

9/10

पृथ्वी कधीही स्थिर नसते

World Earth Day 2024

आपल्याला असे जाणवते की आपण स्थिर आहोत परंतु पृथ्वी सतत वेगाने फिरत असते. ग्रहावर ताषी 1000 मैल वेगाने फिररे.   

10/10

चंद्र क्वॅक्स

World Earth Day 2024

दुरुन असे दिसते की, चंद्र नाही. मात्र चंद्र पृथ्वीप्रमाणे क्वॅक्स करतो. वस्तू थोडी हलवून ठेवतो. चंद्रावरील क्वॅक्स तीव्र किंवा समान नसतात आणि भुकंपीय ऊर्जा सोडतात ती सुमारे 80 पट असते.