मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 24 तास पाणीपुरवठ्यासाठी पालिकेने आखली 'अशी' योजना

Mumbai Water Supply: सध्या पिसे-पांजरापोळ ते मुलुंड या रस्त्यालगत समांतर पाइपलाइनद्वारे पाण्याची वाहतूक केली जाते. या पाइपलाइनला छोटी लाइन जोडून मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांना पाणीपुरवठा केला जातो. 

| Dec 26, 2023, 10:43 AM IST

Mumbai Water Supply: मुंबईत मोडक सागर, अप्पर वैतरणा, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी तलावातून दररोज 3850 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे 380 किलोमीटर पाइपलाइनचे मोठे जाळे आहे. 

1/9

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 24 तास पाणीपुरवठ्यासाठी पालिकेने आखली 'अशी' योजना

Mumbai 24 hour water supply to Mumbaikars BMC plan Marathi News

Mumbai Water Supply : गेल्या काही वर्षात मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे पाण्याची गरजदेखील दुप्पट झाली आहे. त्यात पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन फुटण्याच्या वाढत्या घटनांमुळे मुंबईत पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. मुंबईकरांचा पाणीप्रश्न कायमचा मिटवण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

2/9

महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सर्वेक्षण

Mumbai 24 hour water supply to Mumbaikars BMC plan Marathi News

मुंबईतील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी बीएमसीने पिसे-पांजरापोळ जलशुद्धीकरण केंद्र ते मुलुंडपर्यंत 21 किमी लांबीचा भूमिगत जलबोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू असून या कामासाठी सुमारे 4500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

3/9

पाणीपुरवठा खूपच कमी

Mumbai 24 hour water supply to Mumbaikars BMC plan Marathi News

यामुळे उपनगरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होणार असल्याचे बीएमसी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. विशेषतः डोंगराळ आणि उंचावर असलेल्या भागात, जेथे पाणीपुरवठा खूपच कमी आहे.

4/9

दररोज 3850 एमएलडी पाणीपुरवठा

Mumbai 24 hour water supply to Mumbaikars BMC plan Marathi News

मुंबईत मोडक सागर, अप्पर वैतरणा, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी तलावातून दररोज 3850 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे 380 किलोमीटर पाइपलाइनचे मोठे जाळे आहे. 

5/9

पाणी मुंबईकरांपर्यंत पोहोचत नाही

Mumbai 24 hour water supply to Mumbaikars BMC plan Marathi News

90 किलोमीटर भूमिगत पाण्याच्या पाइपलाइनचाही येथे समावेश आहे. मात्र दररोज पाण्याच्या पाइपलाइनला कुठे ना कुठे गळती होऊन पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होते. त्यामुळे सुमारे 800 ते 900 एमएलडी पाणी मुंबईकरांपर्यंत पोहोचत नाही.

6/9

21 किमी लांबीचा जलबोगदा

Mumbai 24 hour water supply to Mumbaikars BMC plan Marathi News

पाइपलाइनच्या सुरक्षिततेच्या आणि गळतीच्या समस्येला तोंड देण्यासाठी, बीएमसीने पिसे-पांजरापोळ जलशुद्धीकरण केंद्र ते मुलुंडपर्यंत 21 किमी लांबीचा जलबोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

7/9

जमिनीच्या 100 मीटर खाली

Mumbai 24 hour water supply to Mumbaikars BMC plan Marathi News

यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांचा पाणीपुरवठा सुधारेल. त्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. त्याचा अहवाल लवकरच तयार करून बीएमसी प्रशासनाला सादर केला जाईल. हा पाण्याचा बोगदा जमिनीच्या 100 मीटर खाली असेल.

8/9

बोगदा तयार होताच पाणीपुरवठा

Mumbai 24 hour water supply to Mumbaikars BMC plan Marathi News

सध्या पिसे-पांजरापोळ ते मुलुंड या रस्त्यालगत समांतर पाइपलाइनद्वारे पाण्याची वाहतूक केली जाते. या पाइपलाइनला छोटी लाइन जोडून मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांना पाणीपुरवठा केला जातो. 

9/9

समांतर पाइपलाइन

Mumbai 24 hour water supply to Mumbaikars BMC plan Marathi News

बोगदा तयार होताच त्यातून पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. यानंतर समांतर जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, जलबोगद्याला काही धोका असल्यास समांतर पाइपलाइनमधून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.