PHOTO : 12 फेल, घरातून पळाली, अनेक संघार्षानंतर मिळाला पहिला चित्रपट, 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कारावर कोरलं नाव

Entertainment : एखादा चित्रपट फक्त अभिनेत्यामुळे नाही तर एका अभिनेत्रीमुळे हिट होऊ शकतो हे सिद्ध केलंय. चित्रपटाची पार्श्वभूमी नसतानाही बॉलिवूडमध्ये ती आपलं स्थान निर्माण केलंय.  

Mar 23, 2024, 10:36 AM IST
1/8

अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली ही चिमुकली घरातून पळली होती. अनेक संघर्षानंतर तिने एक नाही तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्कारावर आपंल नाव कारलं. 

2/8

आम्ही बोलत आहोत, कंगना रणौत हिचाबद्दल. हिमाचल प्रदेशातील मंडी गावात या अभिनेत्रीचा आज 37 वा वाढदिवस आहे. तब्बल 18 वर्षांपासून ती इंडस्ट्रीत सक्रीय आहे. 

3/8

कंगनाचे वडील बिझनेसमन आणि आई शाळेत शिक्षिका त्यामुळे ती अभिनेत्री बनले असं तिलाही कधी वाटलं नव्हतं. तिच्या वडिलांनी कंगनाने डॉक्टर व्हावी अशी इच्छा होती. 

4/8

पण कंगना बारावीत नापास झाली आणि आई वडिलांनी भांडून काही तरी करण्यासाठी तिने घरातून पळ काढला. दिल्लीत आल्यानंतर मैत्रिणीसोबत राहत असताना थिएटरशी तिचा संबंध आला. 

5/8

थिएटरच्या काही मुलांना जाहिरातीसाठी मुंबईला जावं लागणार होतं, तेव्हा ही संधी कंगनाला मिळाली. जाहिरातीच्या शूटिंगच्या वेळी अनुराग बसूची नजर तिच्यावर बसली होती. 2006 मध्ये 'गँगस्टर' चित्रपटातून तिला ब्रेक मिळाला. 

6/8

कंगना कोणत्याही गॉडफादरशिवाय इंडस्ट्रीत आली होती. पण त्याकाळात तिला आदित्य पंचोलीने मदत केली होती. ते दोघे लिव्ह इनमध्ये राहत होते, असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. आदित्य तिला घरात नजरकैदेत ठेवायचा. एवढंच नाही तर मारहाण करायचा असा आरोप तिने केला होता. 

7/8

एवढंच नाही तर बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशसोबत तिचं सिरियस अफेअर होतं असं कंगनाचे एका शोमध्ये सांगितलं होतं. त्यांच्यामध्ये काही वाद झाले जे तिने मीडियासमोर उघड केले होते. 

8/8

वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी तिने 'फॅशन' चित्रपटासाठी पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. यानंतर 'क्वीन' आणि 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.