Indian Railway च्या नव्या नियमामुळं 'या' प्रवाशांना फटका, होणार कठोर कारवाई

बऱ्याचजणांसाठी रेल्वेनं प्रवास करणं हा सवयीचा भाग. काहीजण कामानिमित्त, काहीजण भटकंतीच्या निमित्तानं किंवा इतर काही कारणानं रेल्वे प्रवास करतात. या रेल्वे प्रवासात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी काही नियम Indian Railway नं आखून दिले आहेत.   

Jul 11, 2023, 08:34 AM IST

Indian Railway : (Asia) आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचं रेल्वेचं जाळं म्हणूनही जगभरात भारतीय रेल्वेची ओळख आहे. विविध भौगोलिक रचना असणाऱ्या प्रदेशांना, प्रांताना आणि अगदी देशांना जोडणारी ही भारतीय रेल्वे अनेकांसाठीच आवडीचा विषय. 

 

1/7

लांब पल्ल्याचा प्रवास

Indian Railway no smoking rules latest updates and news

एखाद्या लांबच्या प्रवासाला निघालं असता बऱ्याचदा ठराविक तासांनंतर या प्रवासाचाही कंटाळा येऊ लागतो. बरीच मंडळी प्रवासादरम्यानचा हा वेळही कसा व्यतीत करता येईल याचा शकला लढवतात. मग ते बैठे खेळ असो किंवा गप्पांचा फड असो. 

2/7

धुम्रपान

Indian Railway no smoking rules latest updates and news

काहीजण मात्र या रेल्वे प्रवासादरम्यान आपल्या आसनावरच खिडकीपाशी किंवा मग रेल्वेच्या दारापाशी उभे राहून सिगरेट- विडी ओडताना दिसतात. मुळात रेल्वेमध्ये धुम्रपान निषिद्ध असूनही त्यांच्या या कृती सुरुच असतात.   

3/7

नियमांचं पालन

Indian Railway no smoking rules latest updates and news

रेल्वेनं आखून दिलेल्या या नियमाचं पालन होत नसल्यामुळं आता मात्र यंत्रणांकडून कठोर पावलं उचलली जात आहेत. ज्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या डब्यांमध्ये स्मोक डिटेक्टर यंत्रणा लावण्यात आली आहे.   

4/7

स्मोक डिटेक्टर

Indian Railway no smoking rules latest updates and news

या यंत्रांमुळं सिगरेट ओढताच या डिटेक्टरच्या नजरेत तुम्ही याल आणि लगेचच रेल्वे अधिकारी तुमच्यावर कारवाई करतील.   

5/7

नियमांचं उल्लंघन

Indian Railway no smoking rules latest updates and news

गेल्या काही काळापासून सातत्यानं धुम्रपान न करण्यासंबंधीच्या नियमांचं उल्लंघन रेल्वे प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांनी केल्याचं पाहिलं गेलं आहे. आता मात्र ही सर्व मंडळी संकटात सापडू शकतात.   

6/7

एसी डब्यांमध्येही ही यंत्रणा

Indian Railway no smoking rules latest updates and news

आतार्यंत रेल्वेच्या 204 गाड्यांच्या स्लीपर क्लासमध्ये स्मोक डिटेक्टर लावण्यात आले असून, 24 एसी डब्यांमध्येही ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. 

7/7

आग लागण्याचा धोका

Indian Railway no smoking rules latest updates and news

रेल्वे प्रवासादरम्यान केल्या जाणाऱ्या धुम्रपानामुळं बऱ्याचदा आग लागण्याचा धोका संभवतो. अशा वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे.