उज्ज्वल निकमांची राजकारणात एन्ट्री! भाजपकडून मुंबईतील 'या' मतदारसंघातून लढणार

Ujwal Nikam BJP: राजकारणात एन्ट्री करत असलेल्या उज्ज्वल निकम यांच्यावर भाजपने विश्वास टाकला आहे.

Pravin Dabholkar | Updated: Apr 27, 2024, 06:53 PM IST
उज्ज्वल निकमांची राजकारणात एन्ट्री! भाजपकडून मुंबईतील 'या' मतदारसंघातून लढणार title=
Ujwal Nikam BJP

Ujwal Nikam BJP: गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई उत्तर मध्य येथून भाजपचा उमेदवार कोण असणार? याबद्दल चर्चा होती. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड लढणार आहेत. पण भाजपने येथून आता उमेदवारी जाहीर केली आहे. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना भाजपने संधी दिली आहे. त्यामुळे भाजपमधून उज्ज्वल निकम आपल्या राजकारणाचा प्रवास करताना दिसणार आहेत. 

मुंबई उत्तर मध्य येथे पूनम महाजन यांचा भाजपने पत्ता कट केला आहे. यानंतर भाजपमधून अनेकजण या मतदार संघासाठी इच्छूक होते. पण राजकारणात एन्ट्री करत असलेल्या उज्वल निकम यांच्यावर भाजपने विश्वास टाकला आहे. महाराष्ट्र भाजपकडून उज्जल निकम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबईकरांसाठी परिचयाचा चेहरा

वर्षा गायकवाड या मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा आहेत. महाविकास आघाडीच्या काळात त्या मंत्रीदेखील होत्या. तर दुसरीकडे उज्ज्वल निकम यांचा चेहरा मुंबईकरांसाठी परिचयाचा आहे. मुंबई हल्ल्यातील सुनावणीत उज्ज्वल निकम यांनी केली.  दहशतवादी कसाबला 2012 मध्ये फाशी देण्यात आली. यात निकम यांनी महत्वाची भूमिका बजावली होती खैरलांजी हत्याकांड सारखे संवेदशील प्रकरण त्यांनी हाताळले.   त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य जागेवरुन पूनम महाजन निवडून आल्या होत्या. याआधी 2004 मध्ये कॉंग्रेसचे एकनाथ गायकवाड आणि 2009 मध्ये प्रिया दत्त येथून खासदार म्हणून निवडून आले होते. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये पूनम महाजन यांच्याबद्दल नाराजी दिसून आली होती. भाजपला येथे योग्य उमेदवार मिळत नव्हता. भाजपचे प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार  यांचे क्षेत्र वांद्रे पश्चिमदेखील याच लोकसभा क्षेत्रात येते. त्यांचे नावदेखील चर्चेत होते. पण त्यांना राज्याचे राजकारण सध्या तरी सोडायचेय असे दिसत नाही. 

पूनम महाजन यांचा पत्ता कट

अभिनेत्री माधुरी दिक्षित हिचे नावदेखील चर्चेत होते. पण त्यांनी यासाठी स्पष्टपणे नकार दिला. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने येथे 3 सर्व्हे केले. ज्यामध्ये पूनम महाजन यांच्याबद्दलचा रिपोर्ट चांगला नव्हता. त्यामुळे चिंतेत असलेल्या भाजपने उज्ज्वल निकम यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे.