पंतप्रधानांची 'भटकती आत्मा' टीका कोणासाठी, फडणवीसांनी थेट म्हटलं, मोदींनी टोपी फेकली आणि...

Devendra Fadanvis Exclusive: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. 

Updated: May 2, 2024, 03:54 PM IST
पंतप्रधानांची 'भटकती आत्मा' टीका कोणासाठी, फडणवीसांनी थेट म्हटलं, मोदींनी टोपी फेकली आणि... title=
zee 24 taas Exclusive Devendra Fadanvis reaction on Bhatakti aatma statement of PM modi

Devendra Fadanvis Exclusive Interview: राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील महाराष्ट्रात सभांचा धडाका घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुण्यातील एका जाहीर सभेमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. 'भटकती आत्मा' असा उल्लेख करत नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.  झी २४ चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांना बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा केली आहे. त्यावेळी त्यांनी मोदी 'भटकती आत्मा' नेमकं कोणाला म्हणाले, यावरही त्यांनी भाष्य केले आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, 'मोदीजींनी कोणाचं नाव तर घेतलं नव्हतं. त्यांनी टोपी फेकली ज्याला आपल्या डोक्यावर घ्यायची होती. त्यांनी ती घेतली. मोदींजींनी फक्त इतकीच वस्तुस्थिती सांगितली की, महाराष्ट्रात काही लोक असे आहेत. जे सत्तेतून बाहेर गेल्यानंतर सत्तेला अस्थिर कसं करता येईल. याचा प्रय़त्न करतात आणि हम ना खेले तो खेल बिघाडे अशा मानसिकतेतेतून काम करतात. म्हणूनच महाराष्ट्रात एकटा देवेंद्र फडणवीस सोडला तर नाईकांनंतर कोणीही पाच वर्षे पूर्ण करुच शकले नाही. त्यामुळं मोदीजींनी एक तथ्य सांगितले आहे. आता काही लोकांनी ते जिव्हारी लावून घेतले. मोदींनी टोपी फेकलीये ज्याला वाटतं मी आहे तो डोक्यात बसवून घेतोय. आम्ही कशाला सांगायचंय,' अशी मिश्किल टिप्पणी फडणवीसांनी केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या 'भटकती आत्मा' या टिकेवरुन विरोधकांनी राळ उठवली आहे. त्यावरही फडणवीसांनी उत्तर दिले आहे. 'आमचे जे विरोधक आहेत. त्यांना कन्स्ट्रक्टिव्ह अपोझिशन हा विषय येत नाही. ते डिस्कक्ट्रिक्टिव्ह अपोझिनस आहेत. त्यांना विरोधी पक्षात गेल्यानंतर विरोध करायचा असतो पण समाजहित, देशहित या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन विरोध करायचा असतो. हे लक्षात येत नाही. ते विरोधाला विरोध करतात,' असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.