शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेची होळी स्पेशल ट्रेन, कधी अन् कुठून सुटणार? पाहा...

Holi Special Trains for Konkan : होळी म्हटलं की चाकरमान्यांची कोकणात जाण्यासाठी घाई असते. याचपार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी पाहता कोकण रेल्वेकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Mar 7, 2024, 10:11 AM IST
शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेची होळी स्पेशल ट्रेन, कधी अन् कुठून सुटणार? पाहा...  title=

Holi Special Trains 2024 News In Marathi : सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्यातच गावी जायचं म्हटलं की पहिलं प्राधान्य भारतीय ट्रेनला दिले जाते. कारण ट्रेनचा प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असतो. त्यातच होळी हा सण येतो. कोकणात होळी सणाचा आनंद वेगळात असतो. या सणानिमित्ताने लाखो कोकणवासी मुंबईहून आपापल्या गावी जातात. याचपार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. 

होळीचा सण दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरु झाली आहे. अनेकांनी महिन्यापूर्वीच आरक्षण करुन ठेवले आहे. असे असेल तरी कोकणात  जाणाऱ्या गाड्यांची प्रतीक्षायादीही तितकीच मोठी आहे. त्यामुळे उत्सव काळात  या गाड्यांना गर्दी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वेने अहमदाबाद ते मडगाव जंक्शन या दरम्यान साप्ताहिक गाडीच्या विशेष दोन फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोकण रेल्वेची ही विशेष गाडी अहमदाबाद ते मडगाव या मार्गावर 19 मार्च 2024 पासून सुरू होणार आहेत. यंदाच्या होळीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर आणि कोकण रेल्वे मार्गावर पहिली होळी विशेष गाडी सोडण्याची घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, 19 आणि 26 मार्च 2024 रोजी फक्त अहमदाबाद ते मडगाव (09412) ही होळी स्पेशल ट्रेन आठवड्यातून एकदा धावणार आहे. अहमदाबादहूनच ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 वाजून 30 मिनिटांनी सुटेल मडगावालाला पोहोचली. 

मडगाव येथून दिनांक 20 आणि 27 मार्च 2024 रोजी परतीच्या प्रवशांसाठी विशेष ट्रेन (09411) सुटणार आहे. मडगावहून ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता अहमदाबादला पोहचणार आहे. 

या गाडीचे थांबे 

वडोदरा, सुरत, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी तसेच करमाळी या स्थानकावर  गाडी थांबणार आहे.