Maharastra Politics : 'मिटकरींचा मेंदू चेक करायला लागेल अन्...', रोहित पवारांचा खणखणीत टोला, म्हणाले...

Baramati Loksabha Election : बारामतीत सध्या राजकीय वातावरण तापलेलं असताना आता रोहित पवारांनी अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

सौरभ तळेकर | Updated: Apr 24, 2024, 05:39 PM IST
Maharastra Politics : 'मिटकरींचा मेंदू चेक करायला लागेल अन्...', रोहित पवारांचा खणखणीत टोला, म्हणाले... title=
Rohit Pawar Criticized Amol Mitkari

Rohit Pawar On Amol Mitkari : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात जोरदार (Maharastra Politics) चर्चा होताना दिसत आहे. राज्यात सर्वाधिक चर्चा होतीये ती बारामती लोकसभा मतदारसंघाची... बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) पुन्हा बाजी मारणार का? बारामतीची जनता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राजकारणाच्या मैदानात जिंकून देणार का? असे सवाल विचारले जात आहेत. अशातच आता सुप्रिया सुळे यांच्यासाठी रोहित पवार (Rohit Pawar) मैदानात उरतले आहेत. पार्थ पवार यांनी काल पुण्यातील बगाड यात्रे दरम्यान रोहित पवारांना हात देत जवळ घेतले होते. यावर मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर उत्तर देताना रोहित पवार यांनी मिटकरींना जोरदार टोला लगावला. 

काय म्हणाले रोहित पवार?

सुप्रिया ताईची लीड आम्ही तीन लाख धरत होतो. बारामतीत आता लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे. सुप्रिया सुळे आधी तीन लाख मताने येतील असं वाटत होतं. मात्र आता 4 लाख मताधिक्याने त्या निवडून येतील. खडकवासला मधून लीड लोकच देणार आहेत. मोठे नेते सोसायटीमध्ये जाऊन प्रचार करत नाहीत. तर राज्यभर फिरत आहेत. काही नेत्यांना आता सोसायोटी लेव्हल जावं लागत आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्यावर भाजपचा दबाव आहे. काही लोक दबाव सहन करतात काही दबाव सहन करत नाहीत. लोक आमची वाट बघतायेत, असंही रोहित पवार म्हणाले.

अमोल मिटकरींवर बोलताना रोहित पवार यांनी चांगलंच खडसावलं. मिटकरींना यात राजकारण दिसत असेल तर, अमोल मेटकरी यांचा मेंदू कुठं आहे हे चेक करावं लागलं, त्याचा मेंदू कुठं आहे ते चेक करावं लागेल, प्रेमाचं नातं असू शकतं. पुरोगामी असणारे लोक आता प्रतिगामी बोलायला लागले त्यावर काय बोलणार, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. विचार सोडून भाजपसोबत जाता जेव्हा तिथे गेल्यावर कशाला बोलायचं हे कळत नाही भाजप विरुद्ध सामान्य लोक अशी लढाई आहे, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.

आश्चर्य वाटतंय की, दोन महिन्यापूर्वी मी पत्रकार परिषद घेतली होती. मला आणि माझ्याबरोबरच्या लोकांना क्लीन चिट दिली आहे हे सांगितलं होतं. मी दोन महिन्यापर्वी सागितलं होतं मग दोन महिने शिळी बातमी आज का दाखवली जातेय कळत नाही. प्रतिमा स्वच्छ व्हावी यासाठी हे आज दाखवलं, क्लीन चिट ज्या दिवशी दिली त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर कारवाई झाली. अजितदादा किंवा सुनेत्रा वहिनी याच्यावर कारवाई का झाली नाही? का झाली नाही ते भाजप सोबत गेले म्हणून झाली नाही का? असा प्रश्न पडतोय. कारवाई फक्त माझीच चालू आहे आता, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आधी अजितदादा बैठक बोलवत असे, पण आता दादांना बोलवावं लागत आहे. हे दुर्दैव आहे. राज ठाकरेंची सभा बारामती लोकसभा मतदारसंघात झाली तर सुप्रियाताईंचं लीड 40 हजारने वाढेल एवढं मात्र नक्की, अशा विश्वास देखील रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.