MPSC Job:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दहावी-बारावी उत्तीर्णांना नोकरी, 1 लाखांपर्यंत पगार

MPSC Recruitment: एमपीएससीअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या एकूण 615 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई म्हणून निवड केली जाईल

Pravin Dabholkar | Updated: Sep 9, 2023, 06:23 PM IST
MPSC Job:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दहावी-बारावी उत्तीर्णांना नोकरी, 1 लाखांपर्यंत पगार title=

MPSC PSI Bharti 2023: एमपीएससी आणि पोलीस भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत बारावी आणि पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 38 हजार ते 1 लाख 22 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

एमपीएससीअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या एकूण 615 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई म्हणून निवड केली जाईल.

GOVT Job: पदवीधरांनो, कॉम्प्युटर ऑपरेटिंग येतं? मुंबईत मिळेल 1 लाख पगाराची नोकरी

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी अधिक 4 वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेली असावी. किंवा बारावी उत्तीर्ण अधिक 5 वर्षे नियमित सेवा किंवा दहावी उत्तीर्ण अधिक 6 वर्षे नियमित सेवा केलेली असावी. 

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 03 ऑक्टोबर 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.मागासवर्गीय उमेदवारांना यातून 5 वर्षांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. 

खुला प्रवर्गातील उमेदवारांकजून 544 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. तर मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ उमेदवारांकडून 344 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. 

Bank Job: कमी शिक्षण झालंय? BOI मध्ये मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 38 हजार 600 ते 1 लाख 22 हजार 800 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही पोस्टिंग दिले जाईल याची नोंद घ्या. 

2 डिसेंबर 2023 उमेदवारांची पूर्व परीक्षा घेतली जाईल. यासाठी छ. संभाजीनगर, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती आणि नाशिक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असेल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना 11 सप्टेंबर 2023 पासून अर्ज करता येणार आहे. तर 3 ऑक्टोबर 2023 ही अर्जाची शेवटची तारीख आहे.