Loksabha Election: ठाकरे गट लोकसभेच्या 18 जागा लढवणार? 'मुंबईत 6 पैकी 'या' 4 जागा...'

Loksabha Election: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाराष्ट्रातील अठरा लोकसभा मतदारसंघात समन्वयक नेमण्यात आले आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Feb 19, 2024, 10:26 AM IST
Loksabha Election: ठाकरे गट लोकसभेच्या 18 जागा लढवणार? 'मुंबईत 6 पैकी 'या' 4 जागा...' title=
Thackeray Group Loksabha Election

Loksabha Election: लोकसभा निवडणूक जवळ येत चालली आहे. राज्यातील प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. शिवसेना, राष्ट्रवादीत फूट झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असेल. यातून मतदारांचा कल कळणार असल्याने या निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष आहे. महाराष्ट्रात ठाकरे गटाकडून 18 लोकसभा जागा लढण्याचे जवळपास निश्चित असल्याचे म्हटले जात आहे. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लोकसभा निवडणूक समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाराष्ट्रातील अठरा लोकसभा मतदारसंघात समन्वयक नेमण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईमधील 6 जागांपैकी 4 जागांचा समावेश आहे. त्यामुळे ठाकरे गट मुंबईमध्ये 4 जागा लढणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा निवडणूक समन्वयक जाहीर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे लोकसभा समन्वयकांमध्ये ठाकरे गटाकडून अनेक नवख्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अटक करण्यात आलेले मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांच्यावर ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर आमदार विलास पोतनीस यांच्यावर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाची आणि संजय कदम यांच्यावर रायगड लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

'कॉंग्रेसव्याप्त भाजप'चा पुढचा अध्यक्षही कॉंग्रेसचा असेल- उद्धव ठाकरेंची भविष्यवाणी

लोकसभा समन्वयक पुढीलप्रमाणे

जळगाव : सुनील छबुलाल पाटील

बुलढाणा : राहुल चव्हाण

रामटेक : प्रकाश वाघ,

यवतमाळ : वाशीम - उद्धव कदम

हिंगोली : संजय कच्छवे

परभणी : शिवाजी चोथे, संतोष सांबरे

जालना : राजू पाटील

संभाजीनगर : प्रदीपकुमार खोपडे

नाशिक : सुरेश राणे

ठाणे : किशोर पोतदार, सुभाष म्हसकर

मुंबई उत्तर पश्चिम : विलास पोतनीस

मुंबई उत्तर पूर्व ( ईशान्य) : दत्ता दळवी

मुंबई दक्षिण मध्य : रवींद्र मिर्लेकर

मुंबई दक्षिण : सुधीर साळवी, सत्यवान उभे

रायगड : संजय कदम

मावळ : केसरीनाथ पाटील

धाराशीव : स्वप्नील कुंजीर

कोल्हापूर : सुनील वामन पाटील.