'भाजप म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात', सुनेत्रा आणि पार्थ पवारांवरही उद्धव ठाकरेंकडून टीका

Loksabha Election 2024 : नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी भाजपसह सुनेत्रा आणि पार्थ पवारांवर टीका केली. 

नेहा चौधरी | Updated: Apr 24, 2024, 11:38 AM IST
'भाजप म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात', सुनेत्रा आणि पार्थ पवारांवरही उद्धव ठाकरेंकडून टीका title=
Loksabha Election 2024 Uddhav Thackeray on Sunetra Pawar and Parth Pawar Security Nanded maharashtra news in marathi

Uddhav Thackeray on Sunetra Pawar and Parth Pawar Security : लोकसभा निवडणूक प्रचारासाठी उद्धव ठाकरे मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. परभणीत भर पावसात त्यांनी सभा घेऊन भाजपवर निशाणा साधला. तर आज त्यांनी अवकाळी पावसामुळे नांदेडमध्ये (Nanded Uddhav Thackeray) पत्रकार परिषद घेऊन भाजपला पुन्हा एकदा टार्गेट केलं. उद्धव ठाकरे यांनी नांदेडचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या समर्थनात पत्रकार परिषद घेतली.

देशात हुकूमशाहीविरोधी लाट आली असून केंद्र सरकार घटना, संविधान बदलतील अशी भीती निर्माण झाली आहे, असं म्हणत महाविकास आघाडीचे 48 खासदार निवडून येतील असा दावा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. तसंच अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेल्यामुळे पक्षाला नवीन संजीवनी मिळाला असं ते म्हणाले. 

तर दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात असंतोष असल्याचं ते यावेळी म्हणाले. मोदी सरकारने सात बारावरील शेतकऱ्यांची नाव खोडून गद्दार सेनेच्या नाव लिहिलं. जर हे सरकार तुम्हाला नकली म्हणत असतील तर ते म्हणालाही नकली शेतकरी म्हणायला मागेपुढे पाहणार नाही, अशी शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात भीती आहे. 

या पत्रकार परिषदेत त्यांनी सुनेत्रा आणि पार्थ पवारांवरही सणसणीत टीका केली. सुनेत्रा पवार यांनी हजारो कोटींच्या घोटाळ्या प्रकरणातून क्लिनचीट मिळाली यावर उद्धव ठाकरेंनी भाजपला वॉशिंग मशीनची जाहिरात असल्याचं दणदणीत टोला लगावला. तर पार्थ पवारांवरही त्यांनी यावेळी खडे बोल सुनावले. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार होतो, इथे सर्व सामान्य आणि महिलांची सुरक्षा ऐरणीवर असताना मोदी गद्दारांना सुरक्षेचं कवत देत फिरत आहेत. 

एकनाथ शिंदेवर बोलण्यास नकार!

या पत्रकार परिषदेत एका पत्रकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आरोपावर प्रश्न विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले की, मी घटनाबाह्य लोकांबद्दल बोलत नाही. त्यांना सकाळी जसं स्क्रिप्ट येतं ते कणून कणून तसंच बोलतात.