मोठी बातमी! भाजपच्या बैठकीदरम्यान राज ठाकरे दिल्लीला रवाना

Raj Thackeray in Delhi: राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 18, 2024, 07:41 PM IST
मोठी बातमी! भाजपच्या बैठकीदरम्यान राज ठाकरे दिल्लीला रवाना  title=
Raj Thackeray inDelhi

Raj Thackeray in Delhi: महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी अपडेट समोर येत आहे. गेल्या काही काळापासून मनसे आणि भाजप युतीची चर्चा सुरु आहे. मनसे नेत्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली होती. तेव्हापासून या युतीबद्दल चर्चा होती. यानंतर देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या नेत्यांनी याबाबत विधाने केली होती. दरम्यान राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हेदेखील त्यांच्यासोबत असल्याची माहिती समोर येत आहे.

उद्या सकाळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीमध्ये महत्वाची बैठक होणार आहे. भाजपच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळेदेखील रवाना झाले आहेत. या बैठकीत राज ठाकरे सहभागी होण्याची शक्यता आहे. मनसेला लोकसभेच्या 1 ते 2 जागा देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

राज ठाकरेंची मनसे आणि भाजपची विचारधारा एकच आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकते, असे संकेत वेळोवळी देण्यात आले होते. 

आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी मनसे बाबत योग्य वेळी निर्णय होईल अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. दरम्यान दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. 

शिंदे गटाकडून प्रतिक्रिया 

राज ठाकरे हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जात आहेत. ते महायुतीत आल्यास आम्हाला आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी 'झी 24 तास'शी बोलताना दिली. तसेच मनसे महायुतीसोबत येण्याबद्दल लवकरच योग्य तो निर्णय होईल, असे सूचक विधान काही वेळापुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते.