Konkan Railway : शिमग्याला कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या; उन्हाळ्याच्या सुट्टीचंही वेळापत्रक समोर

Indian Railways : भारतीय रेल्वेकडून होळीच्या निमित्तानं कोकण आणि इतरही ठिकाणी आवर्जून जाणाऱ्या सर्वांसाठी खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. ही बातमी आजच्या दिवसातील सर्वात उत्तम बातमी असंच म्हणाल.   

Updated: Feb 22, 2023, 06:53 AM IST
Konkan Railway : शिमग्याला कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या; उन्हाळ्याच्या सुट्टीचंही वेळापत्रक समोर  title=
Central and Konkan railway made special arrangments for holi 2023 know train routes and details

Konkan Railway special Trains for holi 2023 : वर्षभर जीव ओतून काम करणाऱ्या कोकणवासियांना गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) आणि शिमगा म्हजेच होळीचे (Holi 2023) वेध लागले की कधी एकदा गावाकडची वाट धरतो याचीच घाई लागते. सणांच्या तारखा कळल्या की ही मंडळी तडक रेल्वे आणि एसटी किंवा मग इतर शक्य असेल त्या मार्गानं गावाकडची वाट धरताना दिसतात. अशा या मंडळींसाठी यंदाचा शिमगोत्सव जरा जास्तच खास असणार आहे. कारण, कोकण रेल्वेकडून या मंडळींसाठी खास रेल्वे गाड्यांची सोय करण्यात आली आहे.

होळीच्या दिवसांदरम्यान कोकणच्या दिशेनं जाणाऱ्यांची संख्या पाहता प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी (indian Railway) रेल्वे विभागानं विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या गाड्यांच्या वेळापत्रकानुसार लोकमान्य टिळक टर्मिनस ते सुरथकल या मार्गावर 3 फेब्रुवारीपासून रेल्वे जाण्यास सुरुवातही झाली आहे. दर शुक्रवारी रात्री 8.15 मिनिटांनी एलटीटी येथून ही रेल्वे निघून दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास निर्धारित स्थानकावर पोहोचते. 

पनवेल- मडगाव विशेष रेल्वे (Panvel - Madgaon)

कोकणात जाणाऱ्यांसाठी (Konkan Railway) पनवेलवरूनही विशेष गाडी सोडण्यात येत आहे. गाडी क्रमांक 01429 रात्री 9.15 वाजता पनवेलमधून निधून मडगाव रोखानं प्रवास सुरु करते. रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी (Roha, Mangaon, Khed, Ratnagiri, Sindhudurg, kankavli, karmali) या स्थानकांवर ही गाडी थांबेल. 

सुरतवरून येणाऱ्यांसाठीही खास रेल्वे 

लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे कोकण रेल्वेची होळी विशेष गाडी वसई, पनवेल, रोहा, रत्नागिरीमार्गे करमाळीला पोहोचेल. (Surat) सुरतवरून 7 मार्चला निघणारी ही रेल्वे संध्याकाळी 7.50 वाजता निघेल. दुसऱ्या दिवशी ती 10.25 वाजता निर्धारित स्थानकात पोहोचेल. फेअर ट्रेन नावे ही गाडी सुरु असेल. 

मध्य रेल्वेकडून होळीसोबतच उन्हाळी सुट्ट्यांसाठी विशेष गाड्या

होळी आणि लागूनच येणारी उन्हाळी सुट्टी पाहता विविध ठिकाणांच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवाशांचा गर्दीचा भार येऊन व्यवस्था कोलमडू नये यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

उन्हाळ्यासाठीच्या विशेष ट्रेन 

01139 नागपूर- मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वे आता 7 जून 2023 पर्यंत प्रवाशांच्या सोयीसाठी असेल. 

ट्रेन क्रमांक 01140 मडगाव- नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष दि. 26 फेब्रुवारीऐवजी आता 8 जून 2023 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत असेल. गैरपावसाळी वेळापत्रकानुसार ती 2 जुलैपर्यंतही प्रवाशांची ने-आण करेल. 

01025 दादर- बलिया त्रै-साप्ताहिक रेल्वे यावर्षी 30 जूनपर्यंत सुरु असेल. 

हेसुद्धा वाचा : Eknath Shinde : पहिल्याच बैठकीत शिंदे गटाच्या शिवसेनेचा मोठा निर्णय; पक्षविरोधी वर्तणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार

01026 बलिया-दादर आठवड्यातून तीनदा असणारीही ही रेल्वे 1 मार्च ऐवजी 1 जुलैपर्यंत प्रवास करेल. 

वरील रेल्वे गाड्यांच्या वेळा आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान अधिकच्या माहितीसाठी प्रवाशांनी www.irctc.co.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.