Baby Names on Hanuman : हनुमानाची पवित्रे नावे मुलांना ठेवल्यास धन्य होईल त्यांचं जीवन

Hanuman Baby Names in Marathi:  'हनुमान जयंती' चैत्र मास पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा 23 एप्रिल रोजी मंगळवारी ही जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी घरी मुलाचा जन्म झाला तर निवडा या खास नावांपैकी एक नाव. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 23, 2024, 03:42 PM IST
Baby Names on Hanuman : हनुमानाची पवित्रे नावे मुलांना ठेवल्यास धन्य होईल त्यांचं जीवन  title=

Baby Boy Names on Lord Hanuman: हिंदू धर्मात चैत्र महिन्यातील पौर्णिमेला 'हनुमान जयंती' साजरी केली जाते. धार्मिक मान्यतांनुसार हनुमानाचा जन्म याच दिवशी झाला होता. हनुमान जन्मोत्सवात बजरंगबलीची पूजा करण्याची परंपरा आहे. असे म्हणतात की, जो कोणी विधीनुसार हनुमानाची पूजा करतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील संकटे कमी होतात. या पवित्र दिवशी तुमच्या घरी जर गोंडस मुलाचा जन्म झाला असेल तर तुम्ही त्यासाठी हनुमानाच्या पुढील नावांचा विचार करु शकता. या नावांच्या अर्थांमध्ये हनुमानाप्रमाणे जिद्द, भक्ती आणि पावित्र्य दडलेलं आहे. 

आपल्या मुलाने हनुमानजींसारखे बलवान आणि धैर्यवान व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. जर तुम्ही देखील हनुमानजींचे भक्त असाल आणि तुमच्या मुलाचे नाव शोधत असाल तर खालील हनुमानजींची नावे नक्कीच आवडतील. या नावांसोबतच त्यांचा अर्थही सांगितला आहे. चला तर मग जाणून घेऊया पवनपुत्र हनुमानजींच्या नावांबद्दल.

हनुमानाच्या नावावरुन मुलांची नावे 

  • अमित विक्रम: या दोन्ही नावांचा अर्थ अमर्याद, अथांग असा आहे. 
  • अनिल: या नावाचा अर्थ आहे पवनपुत्र, वारा, शुद्ध.
  • बजरंगी: देवासाठी लढणारा सेनानी असा या नावाचा अर्थ आहे. 
  • भक्तवत्सल: त्याच्या भक्तांचा रक्षक, या नावामधील तुम्ही फक्त 'वत्सल' हे नाव देखील निवडू शकता. 
  • चिरंजीवी : अमर असा या नावाचा अर्थ आहे. 
  • ध्यानंजनेय: ध्यानाची मनस्थिती असा या युनिक नावाचा अर्थ आहे
  • ज्ञानसागर : ज्ञानाचा सागर, हे पाच अक्षरी नाव अतिशय युनिक आहे. 
  • हनुमान: दैवी, देव असा या नावाचा अर्थ आहे. 
  • इराज: वारा-जन्, हे नाव युनिक आहे. 
  • जितेंद्रिय: ज्याने इंद्रियांवर विजय मिळवला असा तो म्हणजे हनुमान.
  • कलानभ: जो वेळेवर नियंत्रण आणि व्यवस्था करू शकतो
  • महातेज: तेजस्वी एक, हे नाव युिनक आहे पण याचा अर्थ खास आहे. 
  • महावीर: सर्वात शूर असा तो, मुलासाठी निवडा हे नाव
  • प्रतापवत: वैभव असा या नावाचा अर्थ आहे. 'प्रताप' असं देखील नाव निवडू शकता. 
  • रुद्रांश: भगवान शिवाचा एक भाग, मुलासाठी हे नाव खूप खास आहे. 
  • संजू : विजयी, हे नाव फिल्मी वाटेल पण हनुमानाच्या नावावरुन हे नाव ठेवू शकता. 
  • शौर्य : निर्भय, पराक्रमी, शूर असा या नावाचा अर्थ आहे. 
  • तेजस: सर्वात तेजस्वी असा खास अर्थ आहे. 
  • उर्जित: उर्जेने परिपूर्ण अर्थ असलेले 'उर्जित' हे नाव खास आहे.
  • विश्वेश: सर्वोच्च अस्तित्व असा या नावाचा अर्थ आहे. 
  • वायुनंदन: वायुचा पुत्र, पवन देवता हे नाव अतिशय युनिक आहे.