तुमच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा होणार 18 हजार रुपये, 'या' कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

उदया होणार बोनसची घोषणा... दिवाळीपूर्वी जमा होणार खात्यात

Updated: Sep 27, 2022, 09:50 PM IST
तुमच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा होणार 18 हजार रुपये, 'या' कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर title=

Railways Bonus 2022: देशातील 11 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employee) आताची मोठी बातमी. केंद्र सरकार लवकरच या कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट (Diwali Gift) देणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत (central cabinet meeting) कर्मचाऱ्यांच्या बोनसवर (Bonus) निर्णय होण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यास दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रकम जमा होणार आहे.

11 लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा
उद्या होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी (Raiway Employee) उत्पादन लिंक्ड बोनसला मंजुरी मिळू शकते. या बैठकीत अराजपत्रित कर्मचाऱ्यांना (Non Gazetted) संपूर्ण 78 दिवसांचा बोनस प्रस्तावित करण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा सुमारे 11 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे रेल्वेवर 2000 कोटींचा अतिरिक्त खर्च येणार आहे. रेल्वे बोर्डाने याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असून, त्याला लवकरच कॅबिनेटची मंजुरी मिळू शकते. 

इतका जमा होणार बोनस
पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना निश्चित केलेली पगाराची मर्यादा 7000 रुपये प्रति महिना आहे. म्हणजेच 78 दिवसांचा बोनस खात्यात आला तर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या खात्यात कमीत कमी 17951 रुपये येतील. गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला होता.