Shoe Theft Case: चालत्या रेल्वेत सीटखालून बुटाची चोरी, दोन राज्यांचे पोलीस घेतायेत शोध

Viral News : आता एक बातमी रेल्वे प्रवासातील आहे. चक्क चोरट्याने बूटाची चोरी केली आहे. धावत्या रेल्वेमधून एका प्रवाशाचे बूट चोरीला गेले, याप्रकरणी त्याने रेल्वे स्थानकावर तक्रार केली. त्यानंतर दोन राज्यांचे पोलीस चोरीला गेलेल्या बुटांचा आणि चोराचा शोध घेत आहेत. ही न्यूज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Updated: Nov 11, 2022, 01:55 PM IST
Shoe Theft Case: चालत्या रेल्वेत सीटखालून बुटाची चोरी, दोन राज्यांचे पोलीस घेतायेत शोध title=
संग्रहित छाया

Shoe Theft : रेल्वे प्रवास करताना चोरीच्या घटना घडल्याच्या नव्या नाहीत. मात्र, ही चोरी जरा विशेष आहे. चालत्या रेल्वेमधील बर्थखालून एका व्यक्तीचे यूके ब्रँडेड शूज चोरीला गेलेत. शूज चोरीला गेल्याची बाब लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तेव्हापासून यूपी आणि बिहारचे पोलीस चोरीला गेलेले बूट आणि चोरणाऱ्याचा शोध घेत आहेत. बूट चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी शून्य एफआयआर नोंदवला आहे. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. 

पोलिसांनी बूट चोरीची तक्रार नोंदवली

बूट चोरी झालेल्या व्यक्तीच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील मुरादाबादला पोहोचल्यावर सीटखालील बूट पाहिले, तेव्हा ते चोरीला गेले होते. यानंतर त्यांनी रेल्वे मदत अ‍ॅपवर तक्रार दाखल केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल कुमार झा यांचे बूट चोरीला गेलेत. राहुल कुमार झा यांनी सांगितले की, ते जयनगर क्लोन स्पेशल ट्रेनच्या बी-4 बोगीत 51 व्या सीटवर बसले होते. ते अंबाला स्टेशनवरुन प्रवास करत होते. यादरम्यान त्यांचे बूट चोरीला गेले.  दरम्यान, काही लोक छोट्या-छोट्या गोष्टी चोरीला गेल्यावर  तक्रार नोंदवत नाहीत. मात्र, राहुल कुमार झा यांनी बूट चोरीला गेल्याची तक्रार केली आणि ही वृत्त सोशल मीडियावर क्षणात व्हायरल झाले. लोक याकडे मनोरंजक म्हणून पाहत आहेत.

चोरीला गेलेले बूट शोधण्यात पोलीस गुंतले

राहुल कुमार झा यांनी मुरादाबादमध्ये रेल्वे स्टेशन मुझफ्फरपूरचा संदर्भ देत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिस स्टेशनचे एसएचओ दिनेश कुमार साहू यांनी सांगितले की, राहुल कुमार झा या प्रवाशाच्या बूट चोरीप्रकरणी शून्य एफआयआर नोंदवण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या बूट आणि चोरट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

चालत्या रेल्वेमधून शूज चोरीला 

पीडित राहुल कुमार झा यांनी सांगितले की, 28 ऑक्टोबर रोजी ते अंबाला ते मुझफ्फरपूर रेल्वेने  प्रवास करत होते. यूपीच्या मुरादाबादमध्ये उठल्यानंतर त्यांनी आपल्या आसनाखाली शूज पाहिले तेव्हा ते गायब होते. याबाबत त्यांनी रेल मदत अ‍ॅपवर तक्रार केली. यानंतर मुरादाबादमध्ये रेल्वे स्टेशन मुझफ्फरपूरचा संदर्भ देत तक्रार दाखल करण्यात आली.

फिर्यादीनुसार राहुल कुमार झा यांचे बूट निळ्या रंगाचे आणि कॅम्पस कंपनीचे होते. राहुल कुमार झा हे बिहारमधील सीतामढी येथील रहिवासी आहेत. राहुल यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बूट चोरल्याची तक्रार दाखल केली आहे.