जीभेचे चोचले नियंत्रणात कसे ठेवायचे? ऋजुता दिवेकरनं दिल्या स्मार्ट टिप्स

Rujuta Diwekar Tips on Weight Loss : वजन कमी करत असताना फक्त डाएट फॉलो (weight Loss Diet Tips)करून नाही तर त्यासोबत काही चांगल्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत. ऋजुता दिवेकरने Craving वर कंट्रोल कसं कराल ते सांगितलंय?

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 27, 2023, 04:07 PM IST
जीभेचे चोचले नियंत्रणात कसे ठेवायचे? ऋजुता दिवेकरनं दिल्या स्मार्ट टिप्स title=

Rujuta Diwekar on Craving : ऋजुता दिवेकर कायमच तिच्या सोशल मीडियावरुन हेल्थ टिप्स शेअर करत असते. यातील प्रत्येक टिप्स दरवेळेला नवीन माहिती शेअर करत असते. यावेळी ऋजुता दिवेकरने Craving वर कसे कंट्रोल कराल यावर माहिती दिली आहे. जीभेचे चोचले हेच वजन वाढीला कारणीभूत असतात. महत्त्वाच म्हणजे हे कारण प्रत्येकाला माहित आहे. पण तरी ते कसं कंट्रोल करायचं हे कुणाला कळत नाही. ऋजुता दिवेकरने एका व्हिडीओत 3 टिप्स शेअर केलेत. सोबत ओव्हरइटिंग केलात तर काय कराल? 

स्वतःला खाण्याची परवानगी द्या 

अनेकदा डाएट करणारी व्यक्ती कायम स्वतःला खाण्यापासून रोखत असते. पण तसं करू नका.. स्वतःला खाण्याची परवानगी द्या. खाल्ल्यामुळे तुमची भूक पूर्ण होते आणि नको त्या वेळी नको ते पदार्थ खावे लागत नाहीत. अनेकदा भूक मारली जाते किंवा त्यावेळी तो पदार्थ टाळला जातो. पण ती क्रेविंग काही कमी होत नाही. अशावेळी आवडीचा पदार्थ न चुकता खा आणि क्रेविंग टाळा

भूक कायम बदलत असते

भूक कायम बदलत असते त्यामुळे भूक मारु नका. भूकेचं गणित अनकेदा हवामानावर आणि तुच्या मूडवर अवलंबून असते. अशावेळी भूक न मोजता आपण काय आणि किती खातोय हे समजून घ्या. उन्हाळ्यात कमी भूक लागते. तसेच हिवाळा आणि पावसाळ्यात मात्र जास्त भूक लागते. तसेच अनेकदा काहींना मूड खराब असेल तरी देखील जास्त खावंस वाटतं. 

तुमची भूक तुम्हाला माहित आहे? 

कुणाच्या तरी सांगण्यावर डाएट फॉलो करु नका. तुमची भूक तुम्हाला माहित त्यामुळे आपल्या भूकेनुसार योग्य आहार घ्या. किती खायचं आणि कसं खायचं हे तुम्ही ठरवा. स्वतःच्या जीवनशैलीचा आणि आहाराचा विचार करा. त्याप्रमाणे आपला डाएट प्लान बनवा आणि तो फॉलो करा. आपल्या भूकेनुसार जेवा. 

जेवताना काय कराल 

बसून खा - बसून खाणे अत्यंत गरजेचे असते. कारण त्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात जेवता.
चावून खा - चावून खा, चावून खाल्ल्यामुळे जेवण उत्तम पचते आणि त्याचे फॅट मध्ये रुपांतरीत होत नाही. 
टिव्ही न पाहता खा - अनेकदा आपण टिव्ही किंवा मोबाईल पाहताना जेवतो त्यामुळे खूप अन्न खाल्लं जातं.
या तीन गोष्टी न चुकता फॉलो केल्यावर जेवणाकडे शांतपणे लक्ष राहील यामुळे काय खातोय हे नीट कळेल आणि क्रेविंग संपेल.

ओव्हरइटिंग झालं तर काय कराल? 

ओव्हरइटिंग झालं तर मोठा गुन्हा झाला असं काही नाही. उगाचच त्याचा गिल्ट मनात ठेवू नका.